जिल्हा परिषदेचा “खटाव गट” बदलून “पुसेगाव गट” केल्याबद्दल हरकती-सामाजिक कार्यकर्ते जयदीप शिंदे यांचा प्रशासनास उपोषणाचा इशारा

58

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड-सातारा(दि.24जुलै):- ऐतिहासिक, राजकीय ,सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक वारसा लाभलेल्या खटाव चे अस्तित्व संपवण्याचा घाट शासना कडून केला जात आहे.आताच जाहीर झालेल्या स्वराज संस्थेचा निवडणुका मधील प्रारूप गट व गण रचनेत खटाव गाव चे खटाव गट हे नाव बदलून पुसेगाव हे नाव देण्यात आले आहे.

    खटाव या गावाची तालुका म्हणून सरकारी दरबारी नोंद आहे.भौगोलिक दृष्टीने हे मोठं गाव आहे,शिवरायांच्या काळात खटाव गावाचे नावाचा उल्लेख आजही सापडतो.

     खटाव हे गाव राजकीय दृष्टीने महत्वाचे मानले जाते.खटाव गट व गण तसेच मतदार संघाचा आमदार या गावच्या निर्णायक मतावर ठरतो अस गणित अनेक राजकीय जाणकार मांडतात.खटाव या गावातून स्वर्गिय चंद्रहार पाटील, स्वर्गिय केशवराव पाटील आता सध्याचे विद्यमान आमदार महेश शिंदे असे तीन कर्तृत्ववान आमदार या मतदार संघाला दिले आहेत.

     खटाव गावाला मोठी राजकीय परंपरा आहे .अस म्हटलं जातं खटाव तालुक्याचं राजकारण हे खटाव गावा भोवती फिरायच .परंतु या खटाव गावाला नेहमीच सरकार दरबारी अवहेलना व दुजा भाव मिळाला आहे.खटाव गावच राजकीय व प्रशासकीय महत्व कमी करण्याचा प्रयत्न झाला आहे.

तालुक्याचं नाव खटाव पण कारभार वडूज ला आहे.

खटाव विधानसभा मतदार संघाचे नाव बदलून कोरेगाव मतदार संघ असे नाव झाले आहे,आणि आता जाहीर झालेल्या स्वराज संस्थेचा निवडणुका मधील प्रारूप गट व गण रचनेत खटाव गाव चे खटाव गट हे नाव बदलून पुसेगाव हे नाव देण्यात आले आहे.

प्रशासनाच्या या चुकीचा निर्णयाविरुद्ध खटाव मधून काही मुद्यांचा विचार करून सामाजिक क्षेत्रात काम करणारे जयदीप शिंदे यांनी तहसील कार्यालयात हरकत नोंदवली आहे

वरील सर्व मुद्द्यांची कागदोपत्री पुरावा म्हणून जोडणी करून

तहसीलदार खटाव यांना या संदर्भात हरकत अर्ज देऊन जयदीप शिंदे यांनी निवेदन दिले आहे.तसेच निवेदन अर्जासोबत गटाचा नकाशा आणि मतदानाचा व लोकसंख्येचा गोषवारा सोबत जोडला आहे.

तहसीलदार याना या हरकती अर्जाच्या दोन प्रति मध्ये सादर करण्यात आला आहे.

प्रशासनाने जर योग्य निर्णय घेतला नाही तर तहसील कार्यालयासमोर 15 ऑगस्ट ला आंदोलन, उपोषण आणि जर गरज पडली तर आत्मदहनाचा इशारा जयदीप शिंदे यांनी प्रशासनाला तोंडी दिला आहे.

खटावकरानी जर आवाज उठवला नाही तर खटाव गावची अस्मिता आणि खटाव तालुक्याचे अस्तित्व महाराष्ट्राच्या नकाशा वरून मिटून जाईल नामधारी असणारा खटाव तालुका ही ओळख ही पुसून जाईल

राजकारण,वादविवाद बाजूला ठेऊन खटावकरांनी गावासाठी एकत्र येऊन या लढ्यात साथ द्यावी असे आवाहन जयदीप शिंदे यांनी केले आहे.

 *खटाव हे गाव या गटातील लोकसंख्या,क्षेत्रफळाच्या आणि मतदानाच्या बाबतीत सर्वात मोठे गाव आहे ,खटाव गावचे मतदान ९८२७ आहे तर पुसेगावचे मतदान ९१८० आहे.पुसेगाव पेक्षा ७४७ मतदार हे खटाव मध्ये जास्त आहेत खटाव गाव तालुक्याचे गाव आहे.खटाव गावच्या नावाचा, अस्मितेचा आणि अस्तित्वाचा हा प्रश्न आहे.

वरील मुद्यांचा विचार केला तर खटाव गावचे मतदानाने जास्त असून ही खटाव गट हे नाव बदलणे योग्य नाही.असे मत जयदीप शिंदे यांनी व्यक्त केले.