

▪️”फरार” डॉक्टरचे दोघे भाऊ सुद्धा बनले आरोपी ; तेही “फरार”
✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)मो:-7066370489
भंडारा(दि.25जुलै):-साकोली शहरात एका अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करून तब्बल १५ दिवसांपासून फरार असलेला आरोपी डॉ. देवेश अग्रवाल याला पळविण्यासाठी मदत करणारे त्याचे दोन्ही भाऊ डॉ. भरत अग्रवाल व जितेश अग्रवाल यांना सुद्धा पोलीसांनी आरोपी बनविले असून ते सुद्धा फरार झाले आहेत. अशी माहिती काल ( गुरूवार २४ जुलै ) ला पोलीस ठाणे साकोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत अप्पर पोलीस अधिक्षक निलेश मोरे व पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर यांनी दिली व आवाहन केले की, कुणी या आरोपींना मदत करेल त्याला सुद्धा आरोपी करण्यात येईल असे बजावले आहे. पोलिसांनी सर्व एअरपोर्ट वरही सुचना दिली असून उपराजधानीतील पोलीसही फरार डॉक्टरच्या मागावर आहेत हे विशेष.
घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, पोक्सो अंतर्गत गुन्ह्यात फरार असलेला आरोपी डॉ. देवेश अग्रवाल याचा शोध अजूनही सुरू आहे, डॉ. देवेश अग्रवाल यांच्या वकीलाने ता. २२ जुलैला नागपूर उच्च न्यायालयात अर्ज केला होता हे प्रकरण बोर्डवर पण आले व त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळून लावला. याबाबद त्याच्या हॉस्पिटलवर कारवाई होईल, मेडीकल कॉन्सिल वरून परवाना रद्द करण्याची सुद्धा कारवाई केली जाईल, त्यास फरार घोषित करणे, त्याची चल अचल संपत्ती जप्त करणे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी जिल्ह्यातील ७ चमु यावर काम करीत आहेत.
त्यासाठी बालाघाट, गोंदिया, अमरावती, पुणे, हैदराबाद, मुंबई, नागपूरसह इतर राज्यांच्या पोलीस ठाणे यांना सुचवा व वायरलेस संदेशही देण्यात आले आहेत. सर्व जनतेला आवाहन की, या प्रकरणी त्यांच्या नातेवाईक कडून चुकीचे माहिती दिली जात आहे. त्यास लपविण्यासाठी मदत करणे, अश्यांना सुद्धा आरोपी बनविले जात आहे, त्यांचे धागेदोरे हाती लागणार असून जो कुणी अश्या आरोपींना मदत करेल त्याला सुद्धा आरोपी करण्यात येईल व हे तपासात हे निष्पन्न झाले तर अश्यांनाही आरोपी करण्यात येईल. याबाबत आरोपीस शोधण्यासाठी सर्व पोलिस यंत्रणेला लुक आऊट नोटीस पण देण्यात करण्यात आले. आरोपीची कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही. यामध्ये ज्यांनी फरार आरोपीला पळविण्यासाठी मदत केली ते त्यांचे भाऊ डॉ. भरत अग्रवाल व जितेश अग्रवाल यांना सुद्धा आरोपीला मदत केल्याप्रकरणी त्यांना आरोपी बनविले आहे व ते सुद्धा फरार झाले आहेत अशी माहिती दिली. याचे संपूर्ण धागेदोरे तपासावर घेतलेले आहेत.
याप्रसंगी अप्पर पोलीस अधिक्षक निलेश मोरे व पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर यांनी जनतेला आवाहन केले की, कुणीही या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना मदत करू नये असे कळविले आहे. याप्रसंगी सर्व पत्रकार आणि मिडिया प्रतिनिधी या तातडीच्या पत्रकार परिषदेत हजर होते.



