..अखेर जागृत शंकरपूर जनतेचा झाला “विजय”-अंगणवाडीतील अवैध भरती प्रक्रिया रद्द ; प्रकल्प अधिकारी यांची उचलबांगडी 

206

▪️मदतनीस उमेदवार वर्षा लांजेवार अपात्र घोषित 

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)मो:-7066370489

भंडारा(दि.25जुलै):–साकोली तालुक्यात “जागृत” झालेल्या महिला जनतेचा अखेर सत्यावर नेहमी विजय होतो” हे १००% टक्के खरे आहे. व सिद्ध करून दाखविले आहे शंकरपूर ग्रामस्थांच्या वारंवार धडक आंदोलनाने. एका गोरगरीब आदिवासी शिक्षित व होतकरू मुलीला हेतुपुरस्सर डावलून अवैधरित्या अंगणवाडी भरती प्रक्रिया प्रकरणात या जागृत जनतेचा अखेर विजय झाला आहे हे तेवढेच खरे..! यात “जागृत” जिल्हा परिषद सीईओ यांनी सुद्धा टोकाचे पाऊल उचलले आणि प्रकल्प अधिकारी यांनी थेट उचलबांगडी करून अवैध भरती झालेल्या मदतनीसांना अपात्र घोषित केले. 

           गेल्या पाच महिन्यांपासून शंकरपूर येथील जागृत जनतेचा हा संघर्ष सुरू होता. शंकरपुर येथील अंगणवाडी केंद्रात अवैध पद्दतीने भरती राबविल्याने संपूर्ण गावाचे या भरतीला विरोध होता. मागे ०८ मे रोजी महिलांनी साकोली बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर धडक दिली होती. तेव्हा सर्व जागृत गावकऱ्यांनी “साकोली मिडीया” ला तेथे पाचारण केले होते. तेव्हापासून वारंवार ह्या बातम्या सोशल मीडिया व वृत्तपत्रात आल्या होत्या. त्यातच गुरूवार २४ जुलैला जिल्हा परिषद भंडारा येथील मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींदकुमार साळवे यांनी सुनावणी दरम्यान तोडगा काढत दोन्ही बाजू ऐकून गावकऱ्यांची बाजू घेत ही भरती प्रक्रिया रद्द केली. दरम्यानच्या काळात गावकऱ्यांनी जवळपास पंधरा ते वीस निवेदने दिले त्यावर पाच ते सहा सुनावणी ही देखील घेण्यात आल्या, मात्र कुठलाही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नव्हता. याचे मुख्य कारण म्हणजे आयसीडीएस प्रकल्प साकोली येथील प्रकल्प अधिकारी परसमोडे व कनिष्ठ लिपिक एल. पी. अतकरी यांनी भ्रष्टाचार करत तक्रारीचे कागदपत्रे वरिष्ठ अधिकाऱ्यांना न पाठवता आपल्या कडेच दाबून ठेवल्याचे प्रकरण सुनावणी दरम्यान उघडकीस आले.

           या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे गावकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागल्याने, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींदकुमार साळवे यांनी प्रकल्प अधिकारी परसमोडे यांच्यावर त्वरित कारवाई करत नव्याने होणाऱ्या पदभरतीसाठी उचलबांगडी केली व पर्यायी लाखणी येथील प्रकल्प अधिकारी यांच्याकडे पुढील पदभरतीचे कार्य सोपविले. त्यांनी सांगितले की, “नियमाने शंकरपुर येथील स्थानिकांना प्रथम प्राधान्य राहील” वडेगांव येथील रहिवासी मदतनीस उमेदवार वर्षा पंढरी लांजेवार हिची नियुक्ती अंगणवाडी केंद्र शंकरपूर येथून रद्द करीत भरती प्रक्रिया पूर्णपणे स्थगित केली व लवकरात लवकर नव्याने पदभरती प्रक्रिया राबवू असे आश्वासनही मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे यांनी दिले.

           सदर सुनावणी प्रसंगी बसपा साकोली वि. स. स्वप्नील गजभिये, श्रीराम सेना तालुकाध्यक्ष सचिन सोनवाने, माजी सरपंच सुरेश पंधरे, ग्रामसेवक प्रशांत नंदागवळी, माजी शा.व्य.स. अध्यक्षा रामेश्वरी वाढवे, आदिवासी महिला उमेदवार शेजल सयाम, वैशाली सयाम व पुरुष गावकरी हेमराज सयाम, सुकराम सयाम, पुरुषोत्तम सयाम, प्रितेश जुगनायके, वैभव सयाम महिला गावकरी पार्वता सयाम, शिशू वाढवे व उषा सयाम आदी उपस्थित होते.

यात शंकरपूर ग्रामस्थांच्या या जागृतपणा आंदोलनावर त्यांच्या “सत्यमेव जयते” या प्रयत्नांना अखेर यश आले असून साकोली शहरातील एका जागरूक “साकोली मिडीया” व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ भंडारा जिल्हा अध्यक्षांच्या दणक्याने प्रशासकीय यंत्रणा चांगलीच हादरली होती असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे सचिन सोनवाने, सामाजिक कार्यकर्ता महेश पोगळे, किशोर बावणे यांनी केले आहे.