शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा या मागणीसाठी मिरज प्रान्त कार्यालयावर सर्व पक्ष आणि संघटनाचे महाआक्रोश आंदोलन

92

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड-सातारा(दि.26जुलै):- शक्तीपीठ महामार्गच रद्द व्हावा या करीता संघर्ष समितिचे भाई दिगंबर कांबळे व सर्व बाधीत शेतकरी यांचे नेतृत्वात सोमवार दि 28 जुलै रोजी सकाळी 11 वाजता मिरज प्रांत कार्यालयवरती शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा या मागणी करीता महाआक्रोश आंदोलन केले जाणार आहे या आंदोलनात सांगली जिल्ह्यातील शेतकरी संघटना,सर्व राजकीय पक्ष, सर्व शेतकरी बांधव तसेच ख़ास करुन माजिसैनिक आपन शेतकरीच आहोत म्हणुन मोठ्या संख्यने उपस्थित राहण्याचे आववाहन संघटना आणि शेतकरी बांधवाचे वतीने करणेत आले.

       राज्य सरकार कोणाचिहि कोणतीही मागनीच नसताना तसेच रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात आसताना शेतकऱ्याच्या बागायती जमीनी उद्धवस्त करुन निव्वळ बड्या भांडवलदार कंत्राटदार यांच्या फायदयासाठी गडचिरोलीचे गौन खनिज गोव्याला घेऊन जाने साठी शेतकऱ्याचीं हाजारों एकर बागायति जमीन उद्धवस्त करुन शेतकरयांच जीवन उद्धवस्त करू पहात आहे.

   एकिकडे राज्याची आर्थिक स्थति चिंताजनक आसताना सार्वजनिक बांधकाम विभाग 46 हजार कोटी, ग्राम विकास 8 हजार कोटी, जल जीवन 18 हजार कोटी, जल संपदा 19 हजार 700 कोटी, नगर विकास 17 हजार कोटी व इत्तर विभाग आसे मिळून 90 हजार कोटिवर थकले असताना राज्यात शेतकऱ्या बरोबर ठेकेदार आत्महत्या करत आसताना हा 86 ते 90 हजार कोटीचा शक्तिपीठ महामार्ग कश्यासाठी व कोणासाठी असा प्रश्न बाधित शेतकरी बांधव करीत आहेत.