जि.प.प्रा.शाळा मोरेवाडी येथे शालेय साहित्य वाटप

96

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी ) : अंबाजोगाई तालुक्यातील जिल्हा परीषद शाळा मोरेवाडी येथे ईनरविल क्लब अंबाजोगाई च्या वतीने तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को.आँप. बँक यांच्या सहकार्याने दिनांक २६ जुलै रोजी इयत्ता पहिली व दुसरीच्या एकुण ४० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कुल बँग चे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को.ऑप. बँकेचे शाखाव्यपस्थापक संभाजी डाके तर प्रमुख पाहुणे म्हणून ईनरविल क्लब अध्यक्ष सौ.संगीता नावंदर, जयश्री कराड, सौ.ठाकुर मॅडम, लक्ष्मण जाधव साहेब उपस्थित होते. यावेळी ईनरविल क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बनसोडे मॅडम यांनी केले. तालुक्यातील एकुण दहा हजार विद्यार्थ्यांना हे शालेय किट वाटप करण्याचे ईनरविल क्लब व तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. आँप. बँक यांचे उद्दिष्ट आहे. तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. आँप. बँक यांचे उद्दिष्ट आहे.