जिल्हा परिषद आदर्श प्राथ. शाळा पानवन आयडील सेंटरचे उदघाटन आणि लोकांर्पण सोहळा संपन्न

119

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

▪️गावाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालक आणि गावकऱ्यांचे सहकार्य महत्वाचे : मंत्री जयकुमार गोरे

म्हसवड-सातारा(दि.29जुलै):-ग्रामीण भागात असलेल्या पाणवन येथील जिल्हा परिषद शाळेने गुणवत्ता वाढीच्या जोरावर येथील विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवल्याचे प्रतिपादन मा.ना.ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

पानवन येथे जिल्हा परिषद आदर्श प्राथ.शाळा पानवन, ता. माण, जि. सातारा आयडियल सेंटर चे उद्धाघाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला.सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन,सातारा जिल्हा परिषदेचे प्राथ.शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी,गटविकास अधिकारी प. स. माण प्रदीप शेंडगे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, शिक्षण विस्तार अधिकारी शमीमबानू तांबोळी,केंद्रप्रमुख दीपककुमार पतंगे ,माजी कृषी सभापती शिवाजीराव शिंदे,सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे,लाडकी बहीण तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे , भाजपा म्हसवड मण्डल अध्यक्ष प्रशांत गोरड ,अखिल काझी,सोमनाथ भोसले, पानवन चे सरपंच सौ.जयश्री शिंदे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष दादा शिंदे,परागशिंदे,मुख्याध्यापक सुभाष गोंजारी यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

            मंत्री गोरे पुढे म्हणाले की सर्वत्र जिल्हा परिषद शाळांचा पट कमी होत असताना पानवन शाळेने मात्र पट संख्येत वाढ केल्याचे पाहून अभिमान वाटले..तसेच भविष्यात या शाळेने विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी योगदान देण्याचे आव्हान केले.गावाच्या शैक्षिणक प्रगतीसाठी पालक व ग्रामस्थानी शाळेला सहकार्य केलेस शाळेची गुणवत्ता निश्चित वाढणार आहे.

 मा.नागराजन मॅडम यांनी सांगतले की शासनाकडून शाळेसाठी लाखो रुपये खर्च करून भौतिक व शैक्षणिक सुविधा, डिजिटल क्लासरूम, व्हर्च्युअल क्लासरूम, इंट्रॅक्टिव बोर्ड या सुविधांचा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा गावकऱ्यांनी विद्यार्थी प्रगतीसाठी शिक्षकांच्या मदतीने लाभ करून घ्यावा तसेच या सर्व साधनांचा व भौतिक सुविधांची सुरक्षितता राखण्याचे देखभाल करण्याचेआवाहन केले.

         शिक्षण अधिकारी नायकवडी यांनी शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी व टिकवण्यासाठी पालकांचे सहकार्य घेण्याचे सांगितले.

शाळेचे मुख्याध्यापक सुभाष गोंजारी यांनी शाळेच्या प्रास्ताविकात शाळेचा पट, मागील वर्षाच्या तुलनेत 30 ने झालेली वाढ, व नवोदय व शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची माहिती देऊन ग्रामस्थांच्या मदतीने बाला पेंटिंग,फर्निचर,भौतिक सुविधासाटी ग्रामपंचायत सरपंच सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य यांचे सहकार्य लाभल्याचे सांगितले.

    यावेळी शाळेस कमान भेट दिल्याबद्द्ल पराग शिंदे यांचा सत्कार मंत्री महोदय यांचे हस्ते करण्यात आला. आदर्श अधिकारी निवड झालेबद्दलगटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांचा व शाळेतील सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.तसेच स्पर्धेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी सहायक पोलिस निरीक्षक,म्हसवड अक्षय सोनावणे,उपसरपंच चांगुणा शिंदे, किरण बोराटे,जावेद मुल्ला,अनिल पाटोळे,राजीवहत्तीकर,दादासो नरळे, अध्यक्ष गोरख शिंदे,संभाजी शिंदे,धुळेश्वर शिंदे,शंकरशेठ तुपे, नानासो नरळे, पोपट शिंदे,दत्तात्रय शिंदे,नाना शिंदे,यासह गावातील,केंद्रातील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी व महिला वर्ग उपस्थित होते.

कार्यक्रमांचे सूत्रसंचालन राजाराम तोरणे यांनी केले व उपस्थित सर्वांचे आभार मानले