

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.8जुलै):-येथील पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारीपदी नव्याने रुजू झालेले उच्च श्रेणी मुख्याध्यापक शशिकांत मुंडे यांचा शाळेच्या संचालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
गंगाखेड तालुक्यातील डोंगरदरीत असलेल्या पिंपळदरी या गावातील अतिशय हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन गावाचे नाव उज्वल केलेले उच्च श्रेणी मुख्याध्यापक शशिकांत मुंडे यांची गंगाखेड तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारीपदी निवड झाली.
नुकतेच गटशिक्षणाधिकारी भगवान ठूले या पदावरून सेवानिवृत्त झाले त्यांच्या रिक्त पदावर जिल्हा परिषद शाळा मुळी येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक शशिकांत मुंडे यांची निवड तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी पदी झाली.निवडीबद्दल शहरातील रुद्राक्ष इंग्लिश स्कूलचे संचालक धनराज मुंडे,माऊली विद्या मंदिरचे संचालक रवींद्र जाधव,रुद्राक्ष बाळ संस्कार केंद्राचे मार्गदर्शक शेटे यांनी शाल व पुष्पहाराने शशिकांत मुंडे यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



