

स्वातंत्र्य मिळवण्या
देशभक्तांनी प्राण लावले पणाला
त्या देशभक्तांचा विसर पडू नये
कोणत्याही क्षणाला
स्वातंत्र्य मिळवण्या घरदार
सुखसोयी ही धुडकावले
तेव्हा कुठे भारताला
स्वातंत्र्य प्राप्त हे जाहले
भारताच्या या देशभक्तांचा
सन्मान सदा करुया
स्वातंत्र्यदिनी या सर्वांना
श्रद्धांजली आपण वाहुया
जर नसतं बलिदान दिलं
गुलाम राहिलो असतो सदा
गुलामगिरीत जगलो असतो
आपण अजूनही पिढ्यानपिढ्या
स्वातंत्र्य मिळाले ते
आपण टिकवून ठेवुया
मातृभूमीच्या संरक्षणाची
जबाबदारी ही घेऊया
✒️सौ जयश्री निलकंठ सिरसाटे
गोंदिया
मो क्र 9423414686



