

राजुरा, दि. ३१
रंजल्या-गांजल्यांच्या सेवेला धावून जाण्याचा सेवामंत्र आम्हाला लोकनेते, आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दिला आहे. जिल्ह्यात कुठेही आरोग्याची समस्या भासली तर लोकांच्या ओठी आशेने सुधीरभाऊंचे नाव येते. त्यामुळे सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणजे सेवा असा समानार्थी शब्दच आता जिल्ह्यात रूढ झाला आहे. त्यासाठी त्यांच्या सेवाभावी व्यक्तिमत्त्वाला साजेसा उपक्रम राबवून ३० जुलै हा त्यांचा वाढदिवस महाआरोग्य शिबीरासारख्या आरोग्यसेवेच्या माध्यमातून साजरा करण्यासाठी आम्ही संकल्पबद्ध आहोत. अशी भावना आयोजक तथा आमदार देवराव भोंगळे यांनी आपल्या उद्घाटनीय मनोगतातून व्यक्त केली.
माजी मंत्री तथा आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त राजुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात आयोजित केलेल्या भव्य महाआरोग्य शिबीरात ते बोलत होते.
काल (दि. ३०) पार पडलेल्या या महाआरोग्य शिबीरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूरचे डॉ. पवन अरगडे व त्यांच्या चमूने संशयीत शिबिरार्थींच्या कॅन्सर तपासण्या केल्या. तर व्हिएसपीएम दंत महाविद्यालयाच्या चमूने शिबीरार्थींच्या दंत चाचण्या व दंत आरोग्यासंबंधी सेवा पुरविली.
आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे), भारतीय जनता पार्टी राजुरा शहर व ग्रामीण, ग्रामीण रुग्णालय राजुरा, तालुका आरोग्य अधिकारी व चमू यांच्या सहकार्याने पार पडले असून या महाआरोग्य शिबीराचा ४३६४ नागरीकांनी लाभ घेतला असून त्यापैकी ५०३ रुग्ण हे विविध आजारांवरील शस्त्रक्रियेस पात्र ठरले आहेत. या सर्व शिबीरार्थींवर ५ ऑगस्टपासून मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. अशी माहीती ही आयोजक म्हणून त्यांनी यावेळी दिली.
पुढे बोलताना, आरोग्य सेवेसारखे दुसरे पुण्य नाही. आजच्या धावपळीच्या जीवनात ग्रामीण भागातील गोरगरिब बांधव आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात; अनेकदा पैशाअभावी अतीगंभीर आजार अंगावर काढतात त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने भविष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात. अशावेळी गोरगरिब बांधवांना पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत भेडसावणाऱ्या समस्यांचे एकाच छताखाली निदान, उपचार व मोफत शस्त्रक्रिया करून देण्यासाठी हे महाआरोग्य शिबीर आशेचे किरण ठरतात. दरवर्षीच या शिबिरांना मोठे जनसमर्थन ही मिळते. आदरणीय सुधीरभाऊंच्या वाढदिवशी नरसेवा हिच नारायणसेवा मानून जनता-जनार्दनाला आरोग्यसेवा देत खऱ्या सेवाभावाने सुधीरभाऊंच्या दिर्घायुष्याची कामना करणे आम्हाला आत्मीक समाधान देऊन जाते, असेही ते म्हणाले.
या शिबिरांच्या यशस्वीतेसाठी भाजपचे तालुकाध्यक्ष वामन तुराणकर, शहराध्यक्ष सुरेश रागीट, डॉ. सुशील मुंदडा, डॉ. रवी आलुरवार, डॉ. मंगेश टिपणीस, जिल्हा उपाध्यक्ष सुनील उरकुडे, हरिदास झाडे, दिलीप गिरसावळे, मिलिंद देशकर, सतीश कोमरवल्लीवार, भाऊराव चंदनखेडे, शंकर धनवलकर, भाऊराव बोबडे, बृहस्पती साळवे, राधेश्याम अडाणीया, विनोद नरेंदुलवार, अजय राठोड, स्वप्निल राजूरकर, सचिन डोहे,मंगेश श्रीराम, सागर भटपल्लीवार, बापुराव मडावी,आकाश गंधारे, श्रीकृष्ण गोरे, प्रफुल घोटेकर, सचिन बल्की, सचिन भोयर, स्वप्निल राजूरकर, प्रफुल कावळे, मयुर झाडे, वैभव पावडे, लक्ष्मण निरांजने, दिपक झाडे, संजय वासेकर, छबिलाल नाईक, राजकुमार भोगा, अंकुश कायरकर, निलेश वाढई, प्रदीप पाला, रवी ठाकूर, सिनु उत्ननुरवार, रामावतार सोनी, रोशन बंडेवार, जगदीश साठोणे, पुनम शर्मा, प्रणय विरमलवार, अंकुश चव्हाण, महेंद्र बुरटकर, किशोर रागीट,आकाश चिंचाळकर, प्रदीप मोरे, नितीन सिडाम, मंगल चव्हाण, मिथून थिपे, महेश झाडे, नितीन वासाडे, माया धोटे, पौर्णिमा उरकुडे, गौरी सोनेकर, स्वरूपा झंवर, प्रिती रेकलवार, रजनी बोढे , शुभांगी रागीट, ममता केशेट्टीवार, प्रियदर्शनी उमरे, योगिता भोयर, लक्ष्मी बिश्वास,शांता कदम, सारीका शहा, दिपा बोंथला, मीरा कुलकर्णी, प्रतिक्षा पिपरे, सरिता कोंडावार, सपना कोंडावार, मंगला काळे, उज्वला शेंडे, सविता खनके, अश्विनी कोकोडे, महेश ठाकरे,अजय उमरे, प्रदीप मोरे, सलमान खान, रवी रेकलवार, राहुल ढोले, जयवंत कोंडावार, चेतन काटवले, शुभम राखुंडे, तुषार कोरडे, अविनाश ठाकरे, सचिन भटकर आदिंनी परिश्रम घेतले.



