

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.4ऑगस्ट):-इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे शिक्षक व पालक यांची सहविचार सहभाग घेऊन शिक्षक – पालक संघातील प्रतिनिधीची निवड करून संघाचे गठण करण्यात आले. यावेळी शिक्षक – पालक संघातील नवनियुक्त प्रतिनिधीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या संघातील सदस्यांशी परस्पर संवाद कायम ठेवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काम करण्याचा संकल्प घेण्यात आला
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, पालकांच्या मौलिक सुचना या शाळेच्या प्रगतीसाठी आवश्यक असतात. विद्यार्थी व शाळेच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना, विचार पालकांनी सुचवावेत. काही अडीअडचणी असतील तर मुख्याध्यापकांना लक्षात आनून द्याव्यात असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला सीबीएसई शाळेकडून शिक्षक – पालक संघाच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापिका मंजुषा आलोने आणि उपाध्यक्ष सीमा मशालकर, सचिव उमेश लढी, सहसचिव बाळकृष्ण पिंगे यांची नियुक्ती करण्यात आली आणि स्टेट शाळेकडून शिक्षक – पालक संघाच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू , उपाध्यक्ष प्रियाताई नामपल्ली , सचिव रामकली शुक्ला , सहसचिव मंदा उलमाले यांची निवड करण्यात आली प्रत्येक वर्गातून एका पालकाची सदस्य प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सकाळ वृत्तपत्रातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला होता त्यामुळे इन्फंट परिवाराकडून सुद्धा संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक उमेश लढी यांनी केले नवनियुक्त सदस्यांच्या स्वागताची जबाबदारी शाबाज खान यांनी स्वीकारली तर आभार प्रदर्शन मेघा धोटे यांनी केले. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक रफिक अन्सारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



