

सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)
राजुरा- तालुक्यातील चिंचोली खुर्द येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयात चिंचोली ( खुर्द ), महर्षि उत्तम स्वामी महाराज कमवि चिंचोली ( खुर्द ), सावित्री बाई फुले मुला – मुलींचे वसतिगृह तथा महात्मा ज्योतिबा फुले वृद्धाश्रम चिंचोली ( खुर्द ) येथे आरोग्य उप केंद्र गोवरी येथील डॉ शिलकुमार दुधे, अजर काझी, श्रीमती एस एस शंभरकर यांनी आरोग्याबद्दल विद्यार्थांना व वृद्धवहीन महिलांना मार्गदर्शन करून त्यांची तपासणी केली.
या शिबिरामध्ये विद्यार्थी तथा वृद्ध महिलांनी अतिशय सुंदर असा प्रतिसाद दिला व आपली तपासणी करून आयोजकांचे आभार मानले.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक रुपेश सोळंके चिंचोली गावातील उपसरपंच विजय मिलमिले व शाळेतील शिक्षक रवींद्र गोरे, अरविंद ढवळे,संतोष वडस्कर, सुधीर मुनघाटे, प्रवीण गुडपल्ले, अशोक पवार, , कपिल बोपनवार , साहिल सोळंके, शिक्षिका रेश्मा शेख,मालू टोंगे, साधना डाहुले, उपस्थित होते.



