

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*
राजुरा-आयुध निर्माणी चांदा यांच्या कार्यक्षेत्रात चांदा चेक पोस्ट जवळच्या खाली जागेवर जिल्हा नियोजन व विकास आराखडा या योजनेअंतर्गत चार हेक्टर क्षेत्रावर ६ ऑगस्ट २०२५ रोजी सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये ” एक पेड मां के नाम” या अभियाना अंतर्गत वृक्षाछादन वाढविण्याकरिता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तसेच आयुध निर्माण चांदा या कार्यक्षेत्रातील पी.एम.श्री. केंद्रीय विद्यालयाच्या अध्यापिका तसेच विद्यार्थ्यांच्या हस्ते एक वृक्ष लावून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतना मस्के सहाय्यक वनसंरक्षक सामाजिक वनीकरण विभाग चंद्रपूर यांनी केले. तर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांमध्ये वन संरक्षण व संवर्धनाप्रति जागरूकता निर्माण व्हावी म्हणून वनांचे महत्त्व अधोरेखित करण्याकरिता मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात नितीन व्यवहारे जिल्हाधिकारी चंद्रपूर , आयुध निर्माणी चांदाचे प्रवीण कुमार पांडे मुख्य महाप्रबंधक , आनंद सिंग महाप्रबंधक , शुभम दांडेकर उपजिल्हाधिकारी (रोहयो )चंद्रपूर, पदमनामा एच. एस. उपवनसंरक्षक सामाजिक वनीकरण विभाग नागपूर , बापू येडे विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग चंद्रपूर, आशुतोष सपकाळ गटविकास अधिकारी भद्रावती, चेतना मस्के सहाय्यक वनसंरक्षक सामाजिक वनीकरण विभाग चंद्रपूर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी तांबेरे , बल्की तसेच धानकुटे यांनी अथक परिश्रम केले. आयुध निर्माणी चांदा चे पोहाणे व त्यांचे सहकर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



