शहरातील रस्त्याची साफसफाई करून धुळीवर नियंत्रण करावे-शिवसेना ( उबाठा) तर्फे मुख्याधिकारीना दिले निवेदन

180

 

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

राजुरा- शहरातील रस्त्यावर विविध प्रकारची वाहतूक सुरू असून यात आजच्या परिस्थितीला जि.आर कम्पनीचे मालवाहतूक टँक, हाँयवे सुरू आहे. यासह शहरातून शहराहतच जि.आर. कम्पनी मोठ्या प्रमाणात मुरुम टाकण्याचे काम इदिरा नगरातील जागेत करित आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती, मुरम रस्तावर खड्डे पडले असल्याने बुजवण्यात येणाऱ्या गिट्टी रेती मुळे अशा विविध प्रकारच्या घटका मुळे रस्त्यावर धुळिचे साम्राज्य पसरले आहे. ते रस्त्यावर असल्याने शहरातील नागरिकांना धुळिमुळे त्रास होत आहे. तसेच गिट्टी रेतीनी खड्डे बुजविण्यात येत असलेल्या ठिकाणी असलेल्या गिट्टी मुळे नागरिकांच्या जिवास गाडी चालवताना धोका निर्माण होत असल्याने या सर्व बाबी वर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. या उपरोक्त नगरपरिषद प्रशासनाने रस्त्यावर नियमितपणे पाणी मारणे आवश्यक आहे जेणेकरून नागरिकांना धुळिचा त्रास होणार नाही तसेच शहरातील जाणाऱ्या जि.आर.कम्पनी च्या वाहतूक व्यवस्था ला उपरोक्त बाबतीत निर्देश देणे आवश्यक आहे. नगरपालिकेने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस पावले उचलावीत, अन्यथा युवासेना व शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.

शिवसेना युवासेना राजुरा कडून नगर परिषद राजुरा ला निवेदन
शिवसेना युवासेना पूर्व विदर्भीय सचिव निलेश दादा बेलखेडे, युवासेना जिल्हा विस्तराक संदीपभाऊ रियाल पटेल, जिल्हा प्रमुख विक्रांत भाऊ सहारे, नितीन पिपरे यांच्या मार्गदर्शनात युवासेना राजुरा शहर प्रमुख बंटी अरुण पिपरे यांच्या नेतृत्वात मुख्य अधिकारी नगर परिषद राजुरा यांना निवेदन दिले.
यावेळी संदीप वैरागडे, प्रदीप येनूरकर, युवासेना उपजिल्हा प्रमुख कुणाल निळकंठ कुडे, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, युवासेना तालुका प्रमुख प्रवीण पेटकर, संघर्ष वाहन चालक मालक संघटनेचे राजुरा तालुका अध्यक्ष बलवत ठाकरे, मंगल ठाकूर, युवासेना उपतालुका प्रमुख आकाश चुणारकर, जुगल भटारकर, नहिम कुरेशी, प्रेम झाडे, गोलू पिपरे, हर्षल झाडे यांची उपस्थिती होती.