

संजीव भांबोरे
वरोरा (चंद्रपूर)बुध्द धम्म प्रचार समिती शाखा वरोरा द्वारा दिनांक १७ ऑगस्ट २०२५ ला लोकमान्य विद्यालय,सभागृहात धम्म ज्ञान परीक्षा आयोजित करण्यात आली ज्यात १२० विध्यार्थी सहभागी झालेत त्या सर्व विध्यार्थी व पालकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आयोजित करण्यात आले, सदर कार्यक्रमात शालेय तथा कनिष्ठ महाविद्यालयिन विध्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करताना मनोवैज्ञानिक, शिक्षणतज्ञ,ॲड.डॉ.सत्यपाल कातकर, अधिवक्ता,उच्च न्यायालय ह्यांनी समुपदेशन व मार्गदर्शन केले.
सदर प्रसंगी मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक ॲड.डॉ.सत्यपाल कातकर म्हणाले’ “व्यक्तिगत क्षमता व मानसिक वाढ सकारात्मक दिशेने करण्यासाठी समुपदेशन उत्प्रेरक म्हणून सहाय्य करते तेव्हा प्रशिक्षित मनोवैज्ञानिक समुपदेशकांचे समुपदेशन घेतल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येय्यापर्यंत सहज पोहचता येते तसेच सर्वाना जीवनात मोठे व्हावे असे वाटते परंतु योग्य मार्ग वा समुपदेशन मिळत नसल्यामुळे आपण पाहिजे त्याप्रमाणात यशस्वी होत नाही ह्यांचे कारण इच्छा अमर्याद आहेत आणि स्रोत मर्यादित आहेत त्यामुळे आपले मानसिक सामर्थ्य आणि क्षमता वाढविणे अत्यन्त आवश्यक आहे. सनदी अधिकारी वा आयएएस, आयपीएस, आयएफएस आदी महत्वाच्या सेवेमध्ये अधिकारी स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती करण्यासाठी भारतीय संविधानाचे अनुच्छेद ३१५ व ३२० अनुसार केंद्रासाठी संघ लोकसेवा आयोग व प्रत्येक राज्यासाठी राज्यसेवा आयोग स्थापित करण्याची संविधानिक तरतूद आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे भारतीय संविधानाद्वारे स्थापित आयोग होय,राज्यात राजपात्रित अधिकारी वा इतर राज्यसेवा पदाच्या सरळ नियुक्ती स्पर्धा परीक्षा,प्रशासकीय सेवा स्पर्धा, मर्यादित सेवा परीक्षा महाराष्ट्र राज्य आयोग स्पर्धा परीक्षा आयोजित करते त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे. देशाच्या वर्तमान स्थितीवर वास्तववादी भाष्य करताना डॉ. सत्यपाल कातकर म्हणाले देशात व राज्यात परीक्षावर परीक्षा घेतल्या जात आहेत यात सरकारने प्रत्येक कोर्स साठी कॉमन एंट्रेस टेस्ट सुरु केली व प्रवेश स्पर्धा परीक्षा नावाखाली सामन्याची आर्थिक लूट केल्या जात आहे. इंजिनीरिंगमध्ये महाराष्ट्र राज्यात १८३७६० जागा आहेत तर मेडिकल मध्ये राष्ट्रीय पातळीवर लाखोच्या वर जागा आहेत त्यामुळे कोचिंग क्लासेसची बाजारीकरण सुरु आहे व ह्यासाठी बस स्थानक,प्रिंट आणि मास मीडियावर जाहिरात देऊनच नव्हे तर घरोघरी दहावी पास विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या खाजगी शिकवणी वर्गाकडे वळवण्यासाठी फोन द्वारे वार्तालाप करून लाखो विद्यार्थ्यांना आपल्या खाजगी वर्गाकडे आकर्षित करून प्रवेश परीक्षा नीट,जेईई, सीईटी नावाखाली सामान्यांचे श्रमाने कमविलेल्या पैश्याचे आर्थिक शोषण केल्या जात आहे.अशा स्पर्धेच्या जगात टिकायचे असेल वा नौकरी हमखास प्राप्त करायचे असेल तर विद्यार्थ्यांनी कॉस्ट मॅनेजमेन्ट अकाऊंटन्ट सीएमए/ सीए/ सीएस कोर्सकडे बारावी नंतर वळावे व कमी वेळेत, कमी पैशात अधिकारी बनण्यासाठी या कोर्सला प्रवेश घ्यावा तसेच विद्यार्थ्यांनी दृढ संकल्प करून चांगल्या मित्र वा संमुपदेशकांचे समुपदेशन घेऊन उच्च पद प्राप्त करून आपल्या आईवडीलांचे स्वप्न साकार करावे.त्याही पुढे ते म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेकरांच्या मते पालक आपल्या मुलाच्या जन्माचे साथी आहेत कर्माचे नव्हे या संकल्पनेचा आपण त्याग केला पाहिजे.पालक मनी आणतील तर ते आपल्या मुलांचे भवितव्य साकारू शकतात,सोबतच मुलांच्या शिक्षणाबरोबर आपल्या मुलींच्या शिक्षणाचाही गंभीरतेने विचार करून त्यांना उच्च शिक्षण द्यावे असे मार्मिक मार्गदर्शन केले.ह्याप्रसंगी बाळू जिवणे सर ह्यांनीही मार्गदर्शन केले,कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊराव निरंजने,प्रचार प्रमुख,बुद्ध धम्म प्रचार समिती वरोरा हे होते तर प्रमुख अतिथी म्हूणन भाऊराव चिवंडे,माजी गटशिक्षणाधिकारी, रतनजी भोसले, ऋषिजी वाघमारे, अध्यक्ष,समाज क्रांती आघाडी,तालुका राजुरा, डॉ.धनराज वानखेडे,शिंदोला,वणी आणि विजय उपरे,माजी संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे,राजुरा हे अतिथी म्हणून उपस्थित होते तर सुत्रसंचालन अमर पिपरे ह्यांनी केले.कार्यक्रम यशस्वीकरीता आयुष्यमती स्नेहा ठोंबरे,अनुसया पेठकर, मंगला डांगरे,विना लोनबळे व हनुमान येसांबरे, देवराव नगराळे आदिनी मोलाचे सहकार्य केले,सदर कार्यक्रमास बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होऊन मार्गदर्शनाचा लाभ घेतला..



