घरफोडी प्रकरणातील आरोपी निष्पन्न; मुद्देमाल फिर्यादीस परत

155

प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)
गंगाखेड पोलीस ठाणे येथे दाखल झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी महत्त्वाची कामगिरी करत आरोपी निष्पन्न केला असून, त्याच्याकडून चोरी गेलेला एक तोळा सोन्याचा अंदाजे ९२,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदर गुन्हा गु. र. क्र. १४१/२०२५, कलम ३०५ (अ ), ३३(क), ३३१(४) BNS अंतर्गत दि. १० मार्च २०२५ रोजी नोंदविण्यात आला होता. फिर्यादी श्रीधर विश्वनाथ धर्मापुरीकर (वय ५५ वर्षे, व्यवसाय पुजारी, रा. देवळे गल्ली, गंगाखेड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस तपास सुरू करण्यात आला.
पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि किशोर गुडेटवार पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आरोपीचा शोध घेऊन त्याच्याकडून चोरी गेलेला सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. कोर्ट पंचनाम्याच्या माध्यमातून हा मुद्देमाल कायदेशीर पद्धतीने फिर्यादी धर्मापुरीकर यांच्याकडे दिनांक 30 जुलै रोजी 2025 परत करण्यात आला.
मुद्देमाल परत देताना पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, अधिकारी किशोर गुडेटवार पुजारी तसेच अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या यशस्वी कारवाईबद्दल नागरिकांतून पोलिसांचे कौतुक होत आहे.