म्हसवड येथे साहित्य रत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

79

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड-सातारा(दि.2ऑगस्ट):- म्हसवड मधील मल्हारनगर येथे साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते यावेळी 31 जुलै रोजी रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते आण्णा भाऊ यांच्या कार्याला आणि विचारांना आदरांजली वाहण्यासाठी म्हसवड शहरात ठिकठिकाणी आणि शासकीय कार्यालयामध्ये आभिवादन कार्यक्रम पार पडले.

यावेळी सकाळी 9=00 वाजतां साहित्यरत्न,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले म्हसवड नगर परिषद चे माजी नगरसेवक शहाजी लोखंडे, माजी नगरसेवक शिवाजी लोखंडे, भीमराव मस्के नाना व इतर सर्व समाज बांधव तसेच जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यावेळी उपस्थित होते शहरातील जेष्ठ पत्रकार अण्णा टाकणे, म्हसवड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय धट, करण भैय्या पोरे, पत्रकार सचिन सरतापे, दिनेश गोरे, बंटी खाडे, रत्नदीप शेटे,अभिजित सरतापे, विक्रम सरतापे, अविनाश सरतापे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले

जयंती निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे लहान मुलांना वही पेन वाटप करण्यात आले व 105 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

सायंकाळी सहा वाजतां आण्णा भाऊ यांच्या प्रतिमेच्या मिरवणूकिला मल्हारनगर येथून सुरुवात झाली मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे बाबासाहेबाना अभिवादन करून पुढे नगरपालिका रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छ. शिवाजी महाराज चौक मार्गे मल्हारनगर येथे पोहोचली

यावेळी महिला, तरुण, बालगोपाल, वयोवृद्ध यांनी डॉ. आण्णा भाऊंच्या नावाने घोषणा देत होती. वाद्याच्या तालावर सर्वचजन थिरकताना दिसलें.