इनरव्हील क्लब अंबाजोगाई चा पदग्रहण सभारंभ उत्साहात संपन्न

75

अंबाजोगाई ( प्रतिनिधी ) : इनरव्हील क्लब अंबाजोगाई चा नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सभारंभ दि. 2 ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडला. यावेळी नुतन अध्यक्षा म्हणून संगिता नावंदर व नविन कार्यकारिणीतील इतर सदस्यांनी आपआपला पदभार स्विकारला.
येथील खोलेश्वर महाविद्यालयातील स्व. गोपीनाथ मुंडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार नमिताताई मुंदडा उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मावळत्या अध्यक्षा सुरेखा शिरसाठ यांनी मागील वर्षात इनरव्हील क्लबने केलेल्या सामाजिक कामांची उपस्थितांना माहिती दिली. यानंतर त्यांनी चारटर पिन व कॉलर नवीन अध्यक्ष संगीता नावंदर यांच्याकडे सोपवून अध्यक्षीय पदभार दिला. नुतन अध्यक्षा संगिता नावंदर यांनी आपल्या कार्यकाळात तळागाळातील सर्व समाजापर्यंत पोहचुन समाजिक कार्य करण्याचे ठरवले असल्याचे नमुद केले. यावेळी बोलताना आ. नमिताताई मुंदडा यांनी या क्लबच्या माध्यमातून महिला सामाजिक कार्य करत असल्याबद्दल कौतुक केले तसेच क्लबला सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्या हस्ते क्लबच्या सर्व माजी व आजी पदाधिका-यांचा व सुरेखा बंग या आदर्श अपंग गृहिणीचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सचिव कल्पना शिंदे, ट्रेझर जयश्री कराड, आ.एस ओ. रेखा शितोळे, उपाध्यक्ष सुहासिनी मोदी, ईडीटर सुरेखा कचरे, सीसीसी अंजली चरखा यांना पिन प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला इनरव्हील क्लब सदस्य चंद्रकला देशमुख, वर्षा देशमुख, रेखा तळणीकर, जयश्री लव्हारे, साबणे मॅडम, वर्षा ठाकुर, सुनीता कात्रेला, वर्षा जळकोटे, भावना कांबळे, अनिता फड, तन्वी कमळकर, सुलोचना मालवाड तसेच रोटरीचे क्लब अंबाजोगाई व रोटरँकचे अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी, पत्रकार सुरेश मंत्री, सामाजिक कार्यकर्त्या अनिता काबंळे, नगरसेविका संगीता व्यवहारे, सर्व इनरव्हील कल्बच्या सदस्या व विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली निर्मळे यांनी केले तर शेवटी सुवासिनी मोदी यांनी उपस्थितांचे आभार मानले.