

पुसद प्रतिनिधी
पुसद तालुक्यातील बोरी खुर्द मंडळात उपविभागीय अधिकारी पुसद व तहसीलदार साहेब पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकमल मंगल कार्यालय बोरी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न झाले
. या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपल्या समस्या, तक्रारी आणि अर्ज सादर केले. अनेक प्रलंबित प्रकरणांना या निमित्ताने मार्ग मिळाला. शिबिरात विविध उपक्रमांचा १०२७ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. या शिबिराला नायब तहसीलदार वैभव खाडे साहेब, मंडळ अधिकारी विलास धुळधुळे,तलाठी ब्रिजेस डोखळे, अंसूमन निकम, सौरव मनवर, नरेश कराळे,आरोग्य विभाग, आधार सेतु, पशुसंवर्धन, ग्रामपंचायत, विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी समस्या निराकरणासाठी उपस्थित होते.
या शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य, सामाजिक कल्याण आदी विभागांच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. सर्व संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहून कार्य तत्परतेने पार पाडण्यात आले.
शिबिरात प्रामुख्याने रहिवाशी, उत्पन्न, जात प्रमाणपत्रे, रेशन कार्ड वाटप, पीएम किसान योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, घरकुल लाभार्थ्यांना रेती रॉयल्टी प्रमाणपत्र, जिवंत सातबारा, फेरफार नोंदी, कृषी व आरोग्य योजनांचा लाभ असे अनेक कामकाज पार पडले. तसेच आरोग्य विभागामार्फत पाच लाखांपर्यंत आरोग्य कार्ड देण्यात आले.
शिबिरातील महत्त्वाचे लाभ रहिवाशी, उत्पन्न, जात प्रमाणपत्र वाटप, नवीन रेशन कार्ड, नाव नोंदणी, नाव काढणे, पीएम किसान, संजय गांधी, श्रावण बाळ योजनांचा लाभ, घरकुल लाभार्थ्यांना रेती रॉयल्टी प्रमाणपत्र, जिवंत सातबारा व फेरफार नोंदी निकाली काढणे, कृषी सल्ला व योजनांबाबत मार्गदर्शन, करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संचालन कु.श्यामल पवार यांनी तर आभार ब्रिजेस डोखळे यांनी केले.



