पाण्याच्या बाटली वरून झाला वाद,बार चालकाकडून जेवणासाठी आलेल्या गिऱ्हाईकाला अमानुष मारहाण

270

 

प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)

शहरातून जवळच असलेल्या परळी राष्ट्रीय महामार्गावरील मंथन बियर बार हॉटेलवर जेवणासाठी आलेल्या ट्रॅव्हल्स चालकासह सहायकास भाडेकरु हॉटेल चालक,व्यवस्थापक व सहकाऱ्यांनी अमानुष मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शनिवारी रात्री घडली.मारहाण करणाऱ्या भाडेकरू हॉटेल चालक व व्यवस्थापकावर गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की गंगाखेड शहरातील खाजगी ट्रॅव्हल्स चालक धनंजय तोंडगे रा.नरवाडी ता.सोनपेठ,व सहाय्यक केदार काळे रा.कोठाळा तालुका सोनपेठ हे दोघे (दिनांक 9 ऑगस्ट शनिवार) रात्री 10.30 वाजता आपली ट्रॅव्हल्स पेट्रोल पंपावर लाऊन गिर्‍हाईक या नात्याने जेवणासाठी मंथन बियर बार हॉटेलवर गेले असता तेथे सहाय्यक केदार याने हॉटेल व्यवस्थापकास पिण्याच्या पाण्याची बाटली मागितली परंतु हॉटेल व्यवस्थापकाने बाटली दिली नसल्या कारणाने व्यवस्थापक व केदार यांच्यात बोलाबोली झाली तेव्हा हॉटेल व्यवस्थापकानी चालक धनंजय तोंडगे व सहाय्यक केदार काळे यांना हॉटेल मधून बाहेर निघू दिले नाही.

फोन करून भाडेकरू हॉटेल चालक यांना बोलावून घेत हॉटेल चालक, व्यवस्थापक व सहकाऱ्यांनी मिळून ट्रॅव्हल्स चालक धनंजय तोंडगे,सहाय्यक केदार काळे यांना लोखंडी रोडने पायाच्या गुडघ्यावर पाठीवर खांद्याजवळ डाव्या हाताच्या दंडावर अमानुष मारहाण केली व शिवीगाळ करून पुन्हा या हॉटेलमध्ये आला तर जीवे मारून टाकील अशी धमकी दिली.खाली पाडून मारहाण केल्याने खिशातील रोख रक्कम दोन हजार रुपये मोबाईल पडला आसल्याचे फिर्यादिनी म्हटले आहे.

ट्रॅव्हल्स चालक धनंजय तोंडगे यांच्या फिर्यादीवरून (दिनांक १० ऑगस्ट रविवार) रोजी आरोपी हॉटेल व्यवस्थापक (नाव माहिती नाही), राजू गुट्टे,विजय गुट्टे दोघे राहणार कासारवाडी यांच्याविरुद्ध भारतीय दंड न्याय संहिता
कलम 118(1),352,351(2)351(3),3(5) अंतर्गत गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे हे करीत आहेत.