‘कृष्णा’काठच्या दवाखान्यांना डिजिटल पेमेंटचं पित्त:रोख पैसे भरण्याचा अट्टाहास-प्रशासनाला नाही गंभीर्य!

166

 

 

*सातारा ,खटाव /प्रतिनिधी नितीन राजे.(9822800812)*

 

सातारा – एकीकडे केंद्र सरकार डिजिटल भारतचा नारा देत असताना सातारा जिल्ह्यातील कृष्णाकाठच्या दवाखान्यांना मात्र डिजिटल पेमेंटच पित्त असून. बँक अकाउंट ला पैसे असून देखील रुग्णांना रोख रकमेचीच मागणी केली जात असल्याने तळमळत राहावं लागत आहे . कारण एका दिवसात एटीएम च्या माध्यमातून ठराविकच रक्कम काढता येते.
लहानात लहान व्यवसायापासून ते अगदी बड्या व्यवसायांमध्ये देखील यूपीआय डिजिटल पेमेंट चा वापर सर्रास केला जातो बाजारातील किरकोळ व्यापारी असले तरी त्यांच्याकडे डिजिटल पेमेंटची सोय असताना सातारा जिल्ह्यातील कृष्णाकाठच्या दवाखान्यात मात्र डिजिटल पेमेंट स्वीकारण्यास नकार देत असून पैसे रोख रकमेचीच मागणी केली जात आहे. तर त्यांच्या संलग्न असलेले मेडिकल व त्यांच्याच कॅन्टींग मध्ये देखील अगोदर रोख रकमेचे टोकन घेऊनच मग चहा नाश्ता मिळतो. त्यामुळे तेथे देखील डिजिटल पेमेंट स्वीकारले जात नसून या संदर्भात जिल्हा प्रशासनाने ठोस भूमिका घेऊन रुग्णांना न्याय देणे गरजेचे आहे.
सातारा जिल्ह्यातील अनेक रुग्णालयामध्ये डिजिटल पेमेंट स्वीकारले जात नाही हे वरिष्ठांना माहित नाही का? पैसे कोणी कसे स्वीकारावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न असे जिल्हा प्रशासन सांगते. परंतु डिजिटल पेमेंट ने पैसे न घेण्याचा हेतू मोठ्या दवाखान्याचा काय हे प्रशासनाने स्पष्ट केले पाहिजे. व रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना अशा प्रकारचे आडवणूक झाल्यास जिल्हा हेल्पलाइन नंबर तयार करून त्यांच्यावर कारवाई करावी. पण ज्या ठिकाणी असा प्रकार घडत आहे त्यांच्यावर प्रशासन कारवाई करणार का उत्तर देऊन रिकामी होणार.
*यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक यांना तक्रार सांगितले असता याबाबत त्यांनी आयकर विभागाकडे तक्रार द्यावी अशी पेशंटचे नातेवाईकच बेशुध्द होतील असे उत्तर दिले. मग जिल्हा आरोग्य विभागाचा उपयोग काय? आता जिल्ह्यातील चार मंत्री पद असणारा सातारा जिल्ह्यात ही अवस्था असेल यापुढे काय दक्षता घेतील याकडे तर सर्वांचे लक्ष आहे*