

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*
म्हसवड : भारताचा 79 वा स्वातंत्र्यदिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरताव मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.. यावेळी शालेय मुलांमधील मोबाईलचे वेड कमी व्हावे यासाठी मोबाईचे दुष्परिणाम यावर आधारित एक लघुनाट्य सादर करण्यात आले.
यावेळी शिरताव गावचे सरपंच मा.हणमंत हरी विरकर , ग्रामपंचायतीचे उपसरपंच, सर्व सदस्य,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष .पवनकुमार चव्हाण ,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, गावचे पोलीस पाटील सुरेश चंदनशिवे, गावचे माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, प्रतिष्ठित नागरिक तसेच सर्व ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पवनकुमार चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पुळकोटी केंद्राचे केंद्रप्रमुख मा.नंदकुमा तुपे यांनी पालकांना सांगितले की, मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी शिक्षकाबरोबरच पालकांची भूमिका महत्त्वाची आहे.. त्यांनी पालकांना आणि विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी इंग्रजी, मराठी आणि हिंदी मधून भाषणेही केली.तसेच वेगवेगळ्या देशभक्तीपर गीतावरती मुलांनी नृत्याविष्कार सादर केला… यावेळी ग्रामस्थांनी मुलांचे खूप कौतुक केले व त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये खाऊ आणि बक्षीस स्वरूपामध्ये रोख रक्कम सुद्धा दिली. त्याचबरोबर मुलांनी देशभक्तीवर गीतावर उत्कृष्ट कवायत केली .आणि मोबाईलचे दुष्परिणाम यावर आधारित एक छोटीशी नाटिका ही सादर केली. यावेळी अंगणवाडीच्या सर्व लहान मुलांनी अतिशय सुंदर असं नृत्य सादर केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मा.सुशील त्रिगुणे,उपशिक्षक मा अनिल पाटोळे अंगणवाडीच्या सेविका. काजल चव्हाण , चंदनशिवे वस्तीच्या अंगणवाडी सेविका मा.सौ. शारदा लुबाळ आणि मनीषा विरकर उपस्थित होत्या.. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मा..सुशील त्रिगुणे यांनी केले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक मा.अनिल पाटोळे यांनी केले.



