

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर
दारव्हा :- (दिनांक 17 ऑगस्ट) येथे पावसाळा सुरू झाल्यामुळे मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने हासन खान शब्बीर खान यांच्या शेतामध्ये १५ वृक्ष लागवड करण्यात आली.
पर्यावरण संवर्धन व हरितक्रांतीच्या दिशेने एक पाऊल उचलत ही वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली.
या उपक्रमामध्ये मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे तालुका अध्यक्ष मा. जर्ऱार कुरेशी साहेब उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. त्यांच्यासोबत जिशान कुरेशी, मोनिस अहमद, मोहम्मद अफ्फान यांचाही सक्रीय सहभाग होता. वृक्षारोपण ही काळाची गरज आहे आणि अशा सामाजिक उपक्रमांद्वारे पर्यावरण रक्षणाच्या दिशेने सकारात्मक पावले उचलली जात आहेत. मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन भविष्यात देखील असे उपक्रम सातत्याने राबवणार आहे.
अशी माहिती जरार कुरेशी यांनी दिली आहे.



