गणेश मंडळांनी डिजे सारख्या वाद्याला नाकारून पारंपरिक वाद्याला प्राधान्य द्यावे-सूरज गुंजाळ भक्तिभावाने व शांततेत गणेश उत्सव ईद ए मिलाद सण साजरे करन्याचे केले आवाहन

77

 

प्रतिनिधी, (अनिल साळवे, 8698566515)

लोकमान्य टिळक यांनी इंग्रजांच्या काळामध्ये गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले आणि राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी त्याचा वापर केला, ज्यामुळे हा सण अधिक लोकप्रिय झाला.टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देऊन त्याला राष्ट्रव्यापी स्वातंत्र्यलढ्याशी जोडले. आपला स्वातंत्र्याचा लढा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे हा त्यांचा उद्देश होता.असे प्रदीपादन परभणी जिल्ह्याचे नवनियुक्त अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांनी केले.
शहरातील श्री संत जनाबाई महाविद्याल सभागृह येथे दिनांक 21 ऑगस्ट गुरुवार रोजी गंगाखेड उपविभाग प्रशासनाच्या वतीने येणाऱ्या गणेश उत्सव,ईद ए मिलाद सणानिमित्य शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्ष या नात्याने गुंजाळ बोलत होते.या बैठकीस उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे,पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, गटविकास अधिकारी जयराम मोडके,महावितरण शहर अभियंता पंकज गुहे,नायब तहसीलदार मोहम्मद अजीज आदींसह प्रशासनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

पुढे बोलताना गुंजाळ यांनी म्हटले की
गणेश उत्सव हा भारतीय पारंपरिक सण आहे नाच गाण्याचा नाही म्हणून गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी डिजे सारख्या वाद्याला नाकारून पारंपारिक वाद्याला प्राधान्य द्यावे जेनेकरून आपल्याकडून इतर गाव शहर,समाज प्रेरणा घेतील कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही सोबत मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद सण आहे दोन्ही धर्मियांनी मोठ्या भक्ती भावाने आपले सन उत्सव साजरे करावे सामाजिक हिताचे उपक्रम राबवावे असे आवाहन केले ईद ए मिलाद निमित्त गंगाखेड मधील हसनैन कमिटी विवाह सोहळे आयोजित करते ही बाब गौरवाची आहे असेही कौतुक केले.

यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे,पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी बैठकीस उपस्थित दोन्हीही धर्मियांनी आपले सन उत्सव मोठ्या भक्तिभावाने व शांततेत साजरे करावे असे आवाहन केले.बैठकीला माजी उपनगराध्यक्ष अब्दुल अशपाक,हसनैन कमिटीचे मुस्तफा शेख,इकबाल चाऊस,माजी नगरसेवक तुकाराम तांदळे, संदीप राठोड यांच्यासह पोलिस पाटील,शांतता समितीचे सदस्य राजकीय,सामाजिक कार्यकर्ते,व्यापारी बांधव,पत्रकार बांधव,महिला मंडळ, शहरातील गणेश उत्सव समिती,ईद ए मिलाद समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.