ग्राहक पंचायत महाराष्ट्र ची गंगाखेड तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर

186

प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515) महाराष्ट्रात मागील 2010 पासून ग्राहकांना न्याय देत अविरतपणे काम करणारी संघटना असून गंगाखेड तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
अधिक माहिती अशी की, ग्राहक पंचायत महाराष्ट्र या सर्व स्तरातील ग्राहकांच्या हितासाठी काम करणारी संघटना असून आजपर्यंत प्रशासनातल्या अधिकारी वर्गाला नियमानुसार काम करायला भाग पाडून लाखों लोकांना न्याय मिळवून दिला. ग्राहक पंचायत चे सर्व महाराष्ट्रात नूतन कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया सुरू असल्याने परभणी जिल्ह्य़ातही याच प्रक्रिये अंतर्गत गंगाखेड तालुक्यातील व शहरातील नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये तालुकाध्यक्ष म्हणुन प्रभू राठोड, महिला तालुकाध्यक्षा म्हणुन अर्चनाताई जोशी यांची तर शहर अध्यक्ष म्हणुन अमोल नेजे यांची निवड करण्यात आली. तसेच इतर कार्यकारिणी खालील प्रमाणे निवडण्यात आली. महिला तालुका उप तालुकाध्यक्षा जनाताई गळशिंगे , महिला तालुका सचिव वंदना मोरे, तालुका उपाध्यक्ष राजेभाऊ लांडगे, तालुका सचिव संतोष कलिंदर, तालुका सहसचिव अनंत उजगरे, तालुका कोषाध्यक्ष कुलदीप मिंदे, तालुका सल्लागार अॅड विलास लांडगे तसेच शहर उपाध्यक्ष राजकुमार मुंढे, शहर सचिव मिलिंद रायभोळे व शहर कोषाध्यक्ष संतोष मरगिल यांची निवड करण्यात आली. सदरील कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष भुसारे साहेब, जिल्हा महिला अध्यक्षा ममताताई पैठणकर, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकरराव चव्हाण, जिल्हा सहसचिव शर्मा साहेब, जिल्हा सह संघटक अँड उत्तम काळे,जेष्ठ पत्रकार बालासाहेब कदम, सामाजीक कार्यकर्ते व्यंकटराव मुंढे, संजय कांबळे तसेच पालमचे तालुकाध्यक्ष. सुदाम लोंढे. यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा संघटक अॅड उत्तम काळे यांनी केले तर आभार राजेभाऊ लांडगे यांनी केले .