संतानी सामाजिक समता, एकता व समरसतेचा पाया रचला – ह.भ.प.कु.स्नेहल पाटील

62

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगांव – गेल्या सातशे वर्षापुर्वी महाराष्ट्रातील साधु संत व महात्म्यानी समाज जिवनात सामाजिक समता,एकता,व समरसतेचा पाया रचुन सामाजिक जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन सामनेर येथील महिला किर्तनकार कु.स्नेहल पाटील यांनी एका कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले
नुकताच येथील समस्त माळी समाज पंच मंडळाचा वतीने ऋषिपंचमी निमित्त अखंड हरीनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असुन त्या प्रसंगी ह.भ.प.कु.स्नेहल पाटील बोलत होत्या
किर्तनाचा सुरुवातीस जगद्गुरु संत तुकाराम महाराजाचा चार चरणाचा अभंग घेऊन किर्तनास प्रारंभ करण्यात आला त्यात
….होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी, काय करावीं साधनें, फळ अवघेचि येणें, अभिमान नुरे कोड अवघेचि पुरे, तुका म्हणे डोळां विठो बैसला सांवळा…..!
म्हणजे ह्या चार चरणाचा अंभातुन उपदेश देतांना महाराज म्हणतात,
वारकरी व्हा वारकरी व्हा आणि प्रत्यक्ष डोळ्याने पंढरी पहा….
बाकीचे साधने काय करायची आहे? सर्व काही फळ यानेच मिळते. असे केल्याने अभिमान नाहीसा होतो आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात..
तुकाराम महाराज म्हणतात डोळ्यांमध्ये सावळा विठ्ठल बसून राहतो त्यामुळे सर्वत्र त्याचाच प्रत्येय येतो.असे नमुद करून
आपल्या दोन तासाचा किर्तन महोत्सवात कु.स्नेहल पाटील यांनी संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,संत नामदेव,संत सांवता महाराज, संत मुक्ताबाई व संत कान्हुमात्रा अश्या महान संतानी केलेल्या महानकार्याची मंहती विषद करतांना ते म्हणाले की संतानी शेकोडो वर्षा पुर्वी लिहलेल्या ग्रंथ व वाडमय् ची व त्यांचा विचारांची आज ही सामाजिक जिवनात उभेहुब पुर्नवृती होत असून अश्या महान संत व महात्म्याचे नामस्मरण करुन आपणही आपल्या जीवनात सुख शांती अनुभावी व संताचा विचारातुन आदर्श जिवन जगण्याची प्रेरणा घ्यावी असे नमुद करून संत व महात्म्याचा इतिहास सादर केला व प्रतेक संताचे कार्य सर्व समाजाला प्रेरणादायी असल्याचे महत्त्व विषद करतांना त्या म्हणाल्या की सारे विश्वही माझं घर व परीवार असल्याची जाणीव करून देतांना गळयात तुळशीची माळ घाला,एकादशीचे व्रत करा व आयुष्यात एक वेळ पंढरपूरची वारी करुन आपले जीवन भगवंताच्या चरणी अर्पण करा व जिवनात सुख समृद्धी समाधान मिळवा असे आवाहन केले.
कार्यक्रमात शहर परीसरातील असंख्य महिला पुरुष व बालगोपाल मंडळी उपस्थित होती
सदर कार्यक्रम यशस्वी साठी माळी व पाटील समाज अध्यक्ष व पंच मंडळ समाज बांधव यांनी परिश्रम घेतले.

…फोटो कॅप्शन:-ह.भ.प. कु.स्नेहल पाटील,किर्तन प्रबोधन करतांना… सत्कार करतांना छायाताई महाजन
दिसत आहे