प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांचा सत्कार

35

 

 

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

 

नागपूर : खापरखेडा चणकापूर येथे बुद्ध धम्म प्रचारक आदर्श कवी मंडळ नागपूर, आणि सदानंद भजन मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने, स्मृती शेष कवी गायक प्रबोधनकार सदानंद नारनवरे यांच्या १४ वा स्मृतिदिनाचा कार्यक्रम दिनांक-15/09/2025 रोज रविवारला सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत स्थळ- आदर्श धम्म प्रचारक केंद्र खापरखेडा चणकापूर येथे आदरांजली कार्यक्रम पार पडला. सर्वप्रथम विश्वाला शांतीच्या संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, परम पूज्य महामानव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील गायक भीम शाहीर प्रदीप बागवान कडबे यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून प्रज्ञा सूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विज्ञानवादी विचार मांडून. ( दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया. कसे ऋण फेडू तुझे भिमराया, आम्हा लावली तू जिवापाड माया, कसे ऋण फे डू तुझे भिमराया. क्रांतिकारी गीत सादर केले त्यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय अध्यक्ष रवींद्र बोरकर, भदंत नाग दीपंकर महाथेरो, प्रकाश लांजेवार, विजय उ के, सुधाकर पाटील, श्रीधर तागडे, मिलिंद पाटील, पुंडलिक मेश्राम, रामदास जी तागडे, मोतीराम लांजेवार, चंद्रमणी शेंडे, रवींद्र चव्हाण, अमर रंगारी, शाहीर केशव शेंडे, कैलास सहारे, युवराज अडकणे, भीमराव पाटील, रमेश निकोसे सुरेश ढोके, केंद्रीय सचिव सविता नारनवरे, भीम शाहीर प्रदीप कडबे, भाऊराव गोंडाने, मनोहर जामगडे, रमेश रामटेके, भामा सोमकुवर, यमुना लांजेवार, इत्यादी मोठ्या संख्येने गायक कवी उपस्थित होते.