नाशिक मनपा आयुक्तांचे गणेश विसर्जन मिरवणुकीत सासूंबाई सोबत ढोलवादन

101

नाशिक शांतारामभाऊ दुनबळे

नाशिक-: शनिवारी शहरात गणेशोत्सव निमित्त गणरायाला निरोप देण्यासाठी काढण्यात आलेल्या भव्य विसर्जन मिरवणुकीत भाविक, मान्यवर आणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. तर ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेत आणि भक्तीमय वातावरणात नाशिक शहर दुमदुमून गेले. यावेळी एक विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मातोश्री रूपाराणी शर्मा यांचा सहभागी झाल्यावर रूपाराणी शर्मा यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत उपस्थित राहून पारंपारिक ढोल वादनाचा आनंद घेतला. ढोल-ताशांच्या गजरात, नृत्य, रंगीबेरंगी पोशाख, भगवे झेंडे आणि भक्तीमय घोषणांनी नाशिकचे विसर्जन सोहळा अधिकच उत्साहपूर्ण झाला होता. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मातोश्रींच्या उपस्थितीमुळे मिरवणुकीत वेगळाच उत्साह पाहायला मिळाला नाशिक महानगरपालिका
मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री ह्या नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या पत्नी आहे. त्यामुळे मनपा आयुक्तांनी सासूसोबत ढोलवादन केले. यंदा नाशिक
महानगरपालिकेच्या पर्यावरणपूरक विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, स्वच्छता मोहिमा आणि निर्माल्याचे वेगळे संकलन मनपाच्या वतीने उपक्रम राबविण्यात आला नाशिककरांनी याला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देत स्वच्छ व हरित गणेशोत्सवाचा संदेश दिला.