

छत्रपती संभाजीनगर, (16 सप्टेंबर)-
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या केंद्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगर व शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व एक पेड माँ के नाम’ विषयावर दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत मार्गदर्शन, “एक सलाम देश के नाम” देशभक्तिपर गीत सादरिकरण, “एक पेड़ माँ के नाम” अंतर्गत वृक्षारोपण, विद्यार्थ्यांचा सत्कार आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. नवल थोरात, उच्च शिक्षण विभागाच्या संयुक्त संचालिका, पंकजा वाघमारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनाचे सहसंचालक, डॉ. सोमनाथ खाडे, राजश्री शाहू महाविद्यालयाचे प्राध्यापक, डॉ. सचिन मोरे, शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख, डॉ. वैशाली देशमुख, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी, डॉ. प्रीतेश कालन, केंद्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगरचे प्रबंधक, संतोष देशमुख, सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार, प्राध्यापक, डॉ. शरद फुंदे, डॉ. संगीता डोंगरे, डॉ. जलिंदर लाड, डॉ. विकास गंभीरे, डॉ. बापू थोरात, डॉ. पी. आर. गभोरे, डॉ. भगवान कांबळे, डॉ. प्रद्याशैली, सवाई, डॉ. वाय. एस. सिद्धिकी, डॉ. सय्यद अब्रार अहमद, डॉ. एस. पी. बिदरकर, एम आर साबळे, डॉ. खान एस तलत, वसंत संसारे, गायत्री कुलकर्णी, संध्या कानडे, उषा जमधडे, सचिन इघारे, हर्षदा देशपांडे, योगेश गच्चे, रुतुराज काळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष, डॉ. नवल थोरात होते. सूत्रसंचालन महाविद्यालायाची विद्यार्थिनी, पूजा भट्टलवार हिने केले. कार्यक्रमामध्ये “एक सलाम देश के नाम” देशभक्तिपर गीत सादर करणारे वैजीनाथ रेनके, अपर्णा शेवाले, वैष्णवी ठोकरे, आकांक्षा फुंदे, मनोज कान्हेगावकर, प्रज्ञा बंड, कार्तिकी जाधव यांना केंद्रीय संचार ब्यूरो तर्फे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाच्या परिसरात “एक पेड़ माँ के नाम” अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. आज महाविद्यालयामध्ये विश्व ओजोन दिवसानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रम आणि रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते.
यावेळी शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्विते करिता केंद्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगरचे प्रदीप पवार, प्रिती पवार, मालु वाडेकर, शरद सादिगले आणि शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना व संगीत विभागाच्या विद्यार्थी आदिंनी विशेष परिश्रम घेतले.



