उज्जैन येथे एकनिष्ठा फाउंडेशन अवंतिका सेवा राष्ट्रीय पुरस्कार 2025 ने सम्मानीत

32

✒️खामगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

खामगांव(दि.11ऑक्टोबर):- येथील एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशन या सामाजिक संस्थेला प्रभु श्री महाकाल यांच्या पावन भूमी उज्जैन नगरी मध्ये उल्लेखनीय सेवा कार्य केल्याबद्दल उज्जयनी रक्त संचार संस्थेकडून राष्ट्रीय अवंतिका सेवा पुरस्कार 2025 नी सम्मानीत करण्यात आले. सर्वप्रथम दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता टॉवर येथुन रक्तदान, श्रेष्ठदान, अवयवदान, देहदान, नेत्रदान जनजागृती रैली देशभक्ती गीत वाजवून काढण्यात आली या रैली मध्ये आपल्या भारत देशातील महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण राज्यातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

रैलीचे समारोप हॉटेल आस्था गार्डन येथे करून श्री गणेश पूजन करत सम्मान समारोह रक्तदान शिवीराला सुरवात करण्यात आली या शिवीरात देशभरातील 75 लोकांनी गरजु रुग्णासाठी रक्तदान केले.

तसेच प्रभु श्री महाकाल यांच्या पावन नगरी मध्ये उज्जयनी रक्त संचार तर्फे अवंतिका सेवा पुरस्कार 2025 नी एकनिष्ठा फाउंडेशनचे संस्थापक सुरजभैय्या यादव, जिल्हाध्यक्ष शेखर रिछारीया, सदस्य आकाश सोनोने यांना मुख्यमंत्री मध्य प्रदेश डॉ. मोहन यादव मध्य प्रदेश यांचे मोठे बंधु समाजसेवी नारायण यादव, कैबिनेट मंत्री सनवर पटेल वक्फबोर्ड अध्यक्ष या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले एकनिष्ठा फाउंडेशन करत असलेल्या सेवाकार्याची प्रशंसा सुद्धा केली व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा पण दिल्या अशी माहिती अजय निंबाळकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.