किमान आधारभूत किंमतीवर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी “कपास किसान” ॲपवर नोंदणी करावी

21

▪️गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतकऱ्यांना आवाहन 

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.10ऑक्टोबर):- तालुक्यातील शेतकऱ्यानी 2025-26 या वर्षात किमान आधारभूत किमतीवर (एमएसपी) योजनेअंतर्गत आपला कापूस विकण्यासाठी मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर मधून “कपास किसान”ॲप डाऊनलोड करून ॲपद्वारे दिनांक 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत स्वतःची नोंदणी करण्याचे आवाहन गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव भोसले,उपसभापती संभाजीराव पोले,सचिव परमेश्वर वानखेडे व सर्व संचालक मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेचा लाभ मिळावा यासाठी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) च्या वतीने “कपास किसान” मोबाईल ॲप आणले असून या ॲपवर कापसाची नोंदणी केल्याने शेतकऱ्यांना आपल्या कापसाला शासकीय दर मिळणार आहे. यासाठी गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी 30 ऑक्टोबर पर्यंत जमिनीच्या नोंदी 2025-26 चे ऑनलाईन अद्ययावत कागदपत्रे महसूल प्राधिकरणाने योग्यरीत्या प्रमाणित केलेल्या पीक लागवडीची नोंद 2025-26 चे ऑनलाईन अद्ययावत स्वतःचे वैद्य आधार कार्ड फोटो दिलेल्या कालावधीत वेळेवर स्व:नोंदणी करून किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती गंगाखेडच्या वतीने शेतकऱ्याना करण्यात आले आहे.