Home चंद्रपूर श्री शिवाजी महाविद्यालयाची सायली रोगे हिची राज्यस्तरीय इंद्रधनुष्य स्पर्धेकरिता निवड 

श्री शिवाजी महाविद्यालयाची सायली रोगे हिची राज्यस्तरीय इंद्रधनुष्य स्पर्धेकरिता निवड 

94

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428)

राजुरा(दि.2नोव्हेंबर):-श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजूरा जिल्हा चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाची स्वयंसेविका कु. सायली दशरथ रोगे हिची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे ५ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान होत असलेल्या “इंद्रधनुष्य“ राज्यस्तरीय निवड चाचणी मधील गीत गायन या कला प्रकारासाठी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या संघात सायली ची निवड झाली आहे.

यापूर्वी सायली ने राष्ट्रीय एकात्मता शिबिर चंदीगड, राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धा “उत्कर्ष” पुणे येथे राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे नेतृत्व करत सहभाग नोंदवला होता.

महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात, एन एस एस च्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात सुद्धा सायली चा हिरहिरीने सहभाग असतो. तिच्या निवडी बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.एम. वारकड, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व अन्य प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सायली चे कौतुक करून अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.