म्हसवडचे पत्रकार मंदार गोंजारी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पत्रकारितेतील सर्वोच्च मानाचा रामनाथ गोयंका पुरस्कार प्रदान

183

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड/सातारा(दि.22मार्च):-पत्रकारीता जगतात दिला जाणारा सर्वोच्च मानाचा समजला जाणारा स्व. रामनाथ गोयंका पत्रकारिता पुरस्कार या वर्षी प्रथमच माण तालुक्यातील म्हसवड येथील ए. बी. पी. माझाचे पत्रकार श्री. मंदार गोंजारी यांना नवी दिल्ली येथे मा. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते देण्यात येवून सत्कार करण्यात आला रामनाथ गोयंका फाऊंडेशनकडून पत्रकारितेतील अतुलनीय कामगिरीबद्दल दरवर्षी पत्रकारांना सन्मानीत केले जाते.

यात शोधपत्रकारीता व विविध प्रादेशिक भाषेमध्ये उत्तम कामगिरी केलेल्या पत्रकारांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो त्यात सर्वोत्तम पत्रकारिता पुरस्कार मा. राष्ट्रपतींच्या हस्ते देऊन श्री. मंदार गोंजारी यांचा सत्कार केला गेला तो आपणास वेगळ्या उंचीवर घेऊन जाणार व अभिमानास्पद आहे. आजवर श्री. मंदार गोंजारी यांनी पत्रकार म्हणून जनतेचे प्रश्न मांडतांना जनतेची झालेली परवड,लोकांना किमान सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी परखडपणे मांडलेली मते लोकांचा न्यायासाठी संघर्ष व सर्वोत्तम बातम्या साठीचे प्रयत्न, जास्तीत जास्त लोकांना न्याय देण्यासाठी केलेलं एबीपी माझाचा वार्ताहर म्हणून केलेलं प्रामाणिक प्रयत्न याचा सन्मान म्हणून श्री. मंदार गोंजारी यांना हा मिळालेला रामनाथ गोयंका यांचे नावाचा पुरस्कार आज मा. राष्ट्रपती यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार म्हणजे म्हसवडकर नागरीकांचा एक प्रकारे गौरव असून देशाचे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांचे हस्ते म्हसवड शहरातील हा पहिला गौरव मानला जात असल्याने म्हसवड सह सनगर समाजाच्या वतीने हि मध्ये फटाक्यांची अतिषय बाजी करून पेढे वाटण्यात येवून अनेकांनी अभिनंदन केले