

▪️राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थांचा पुढाकार
✒️राजुरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
राजुरा(दि.22मार्च):-बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथे राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब च्या वतीने जागतिक जल दिनाच्या निमित्याने थेंब आज हा पाण्याचा, पाणी मिशन वर आधारित कविता, गाणे सादर करण्यात आले. राष्ट्रिय हरीत सेना विभाग प्रमूख बादल बेले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी जागतिक जल दिनाच्या निमित्याने विद्यार्थांना जलसंवर्धनाचा उद्देश गोड्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोताचे शाश्वत व्यवस्थापन करणे, जलमंडलाचे संरक्षण करणे आणि सध्याच्या आणि भविष्यातील मानवी मागणीची पूर्तता करणे यावर मार्गदर्शन करण्यात आले.
जलसंवर्धनामुळे पाण्याची टंचाई टाळणे शक्य होते. या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व धोरणे, धोरणे आणि उपक्रमांचा त्यात समावेश आहे. जल प्रदूषण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यावरही चर्चा करण्यात आली. यावेळी दोन्ही शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षीका, विध्यार्थी यांचें सहकार्य लाभले. सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र राजुरा अंतर्गत दिलेल्या विविध उपक्रम,कार्यक्रम हे दरवर्षी आदर्श शाळेत राबविले जातात.



