

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.23मार्च): -गंगाखेड शहर हे संतांची भूमी मानली जाते या शहरास जानाई नागरी असे ही म्हणतात परंतु या ठिकाणी काही तरुण,सोशल मीडियाच्या पोस्टवरून दोन गटात तरुणांत वाद झाल्याने शुक्रवार रोजी रात्री गंगाखेड शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परंतु पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करत शांतता राखण्याचे आवाहन करत दोषीवर गुन्हा दाखल केल्यामुळे शहरातील वातावरण शांत झाले आहे.
सविस्तर माहिती अशी कि गंगाखेड शहरातील नगरेश्वर गल्लीतील राहणार अभिषेक उमा खवडे या तरुणाने त्याच्या इंस्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवर संभाजी महाराज यांचे हातात तलवार व त्यांचे पायाखाली आरंगजेबाचा फोटो असलेली व त्याखाली औरंग्याच्या आवलादिंनो तुम्ही कितीही भुंकलात तरी तुमच्या नाजाइस बापाची माझ्या राजाच्या समोर हीच लायकी आहे असा फोटो व गाणे असलेली रिल्स स्टोरी ठेवली असता आयान, रिजवान, फैजल पुर्ण नाव माहित नाही.वइतर ४ ते ५ जणांनी शुक्रवार २१ मार्च रोजीचे रात्री ८:३० वाजेच्या सुमारास गैरकायद्याची मंडळी जमवुन अभिषेक उमा खवडे यास स्टोरी का ठेवलीस असे म्हणुन लाथा बुक्यांनी मारहाण केली व तु मला खेटायचे तर खेट असे म्हणुन धमकी दिल्याची फिर्याद अभिषेक उमा खवडे वय २२ वर्षे रा. नगरेश्वर गल्ली याने दिल्यावरून मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास १) आयान, २) रिजवान, ३) फैजल पुर्ण नाव माहित नाही व इतर ४ ते ५ जण सर्व रा. राजमोहल्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास पोउपनि विशाल बुधोडकर करीत आहे.
घटनेची माहिती समजताच परिविक्षाधीन सहा. पो. अ. ऋषिकेश शिंदे यांनी तातडीने राजमोहल्ला व नगरेश्वर गल्लीकडे धाव घेत रस्त्यावर जमत असलेल्या तरुणांना शांतता राखण्याचे आवाहन करत पांगविले. त्यानंतर रात्री उशिराने पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील, पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड आदींनी गंगाखेड शहराला भेट देत गस्त केली.



