अवैध दारू विक्री थांबविणासाठी विहीरगाव येथे दारूबंदी समिती स्थापन

116

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.30 मार्च):- ग्राम पंचायत विहीरगाव येथे महिला सभा सरपंच सौ. शितल प्रविण मूंढरे यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली, या सभेत दारूबंदी समीती गठीत करण्यात आली.

   दारूबंदी समीतीच्या अध्यक्षपदी शिला युवराज गेडाम यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी दादाती अर्जुन जिवतोडे, सचिवपदी ताराबाई मारोती कोसरे , कोषाध्यक्ष उमेश मारोती कोसरे यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून दर्शना प्रविण नन्नावरे, वर्षा बाळकृष्ण जिवतोडे, प्रेमिला रविंद्र बारेकर,बकू उत्तम श्रीरामे, कचरा दिनकर दडमल, सुशिला मारोती धारणे,सुनंदा दयाराम घरत, वैशाली समरीत बारेकर, दुर्गा तिरदास नन्नावरे, आशा चंद्रशेखर नन्नावरे, दौलत नामदेव मोहीनकर, सहदेव रामा बारेकर, मंदा कचरु नन्नावरे, निलेश खंडू रंदये, संदीप अशोक रामटेके, चंद्रकला ईटलकर,मिथून भिमराव कोसे,

कविता वासुदेव जिवतोडे, कविता कैलास जिवतोडे, वनिता पांडुरंग जिवतोडे, वनिता शिवदास राणे, करीश्मा दिवाकर बारेकर, मिराबाई दिवाकर बावणे, शैलेश गुलाब पाटील, केशव दयाराम घरत, विजय रामदास नन्नावरे, आशा ईश्वर रामटेके, अश्विनी सुधाकर वाघमारे इत्यादी सदस्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

                           महीला सभेत गावातील ग्रामस्थांनी असा ठराव मंजूर केला की, विहीरगाव परीसरात दारू अथवा मादक पदार्थांच्या वापरावर पुर्णतः बंदी किंवा निबंध करीत आहोत. कलम ३७ नुसार गावात मादक पदार्थ विक्री करण्यास किंवा दारू कारखाना स्थापन करण्यास पुर्णतः बंदी असेल यासाठी दारूबंदी समेती स्थापन करून महिला मंडळ त्यावरती नियंत्रण ठेऊन तसे आढळल्यास संबंधित व्यक्तींवर योग्य कारवाई करण्यात येईल असा असा ठराव महीला ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

दारूबंदी समेतीच्या सर्व सदस्यांनी दारुबंदी समेती गठीत केल्याची यादी चिमूर पोलिस स्टेशनला सादर केली आणि विहीरगाव परीसरात अवैध दारू विक्री आळा घालण्यासाठी पोलिसांनी सहकार्य करण्याची मागणी केली.यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दादाजी नैताम उपस्थित होते.