11एप्रिल रोजी चिमुर तालुका ई-रिक्षा असोसिएशनच्या वतीने महात्मा फूले व डॉ. आंबेडकर जयंती निमीत्याने बुध्द भिम गीतांचा कार्यक्रम आयोजित

200

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.5एप्रिल):-चिमुर तालुका ई-रिक्षा असोसिएशनच्या वतीने दिनांक 11 एप्रिल रोजी क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले तथा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मीत्याने चिमुर तहसिल कार्यलयाजवळ गोकुल सिडाम, साक्षी कोसारे, आचल बारसागडे द्वारा प्रस्तुत बुद्ध भिम गिताचा संगीतमय आर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ बहुजन विचारक धर्मदास गेडाम राहणार असुन यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन अमित भिमटे, शुभम मंडपे, विनोद सोरदे, सचिन लभाने आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी जेष्ठ रिक्षा चालक पुंडलिक गोठे, मुस्ताख इब्राहिम शेख, सोनु अय्याज शेख यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन चिमुर तालुका ई-रिक्षा असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश मेश्राम, उपाध्यक्ष रोशन शेंबेकर, सचिव स्वप्नील हजारे, रविंद्र नंदेश्वर, कुंदन टेभुर्णे, अनिल नवले, अभिजीत बांडगे, विजय गोठे, राकेश मेश्राम, जगदिश रामटेके, प्रविण शेंडे, वंदना घोनमोडे, किशोर खोब्रागडे आदिने केले आहे.