✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
जळगाव(दि.5एप्रिल):- महान सम्राट अशोक यांची २५३९ वी जयंती अजिंठा हाउसिंग सोसायटीतील जेतवन बुद्ध विहारात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ होते , प्रा. किसन हिरोळे , इंजी. ममता सपकाळे यांची मुख्य भाषणे झाली . त्यांनी सम्राट अशोक यांच्या जीवन कार्याची सविस्तर माहिती दिली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती भालेराव , प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन दिलीप सपकाळे ,आभार प्रदर्शन ॲड. आनंद कोचुरे , स्वागत पी. डी. सोनवणे , परिचय नथु अहिरे यांनी तर बाबुराव वाघ यांनी बुद्ध वंदना घेवून प्रतिमेचे पूजन केले . सम्राट अशोक यांची जयंती दरवर्षी साजरी करण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला .
या प्रसंगी विजया शेजवळे, हर्षल सुरळके, संजय सपकाळे , विमल भालेराव , सुमन बैसाने , अंजना भालेराव , मनकर्णा सुरवाडे , कविता सपकाळे , गीता सोनवणे , आशा सपकाळे , कल्याणी सुरळके, लता बिऱ्हाडे, कुसुम सोनवणे , राधिका जोहरे , अशोक सैंदाणे , आदींसह बहुसंख्य स्त्री पुरुष कार्यक्रमास हजर होते .
कार्यक्रमाच्या सुरवातीस भगवान बुध्द , सम्राट अशोक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.