कांचा जंगलातील वृक्षतोड व वन्यजीव हत्या थांबवण्यासाठी पंतप्रधान यांना निसर्ग प्रेमी यांचे निवेदन

96

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.8एप्रिल):- तेलंगणा राज्यातील हैदराबाद शहरा जवळील कांचा परिसरात ४०० एकर जंगलात सुरू वृक्षतोड असून वन्यजीव हत्या मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे या प्रकरणी केंद्र सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावाअशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अड.उत्तम काळे यांनी निवेदनाद्वारे सात एप्रिल रोजी केली आहे.

तहसीलदार गंगाखेड यांच्या मार्फत हे निवेदनवर म्हटले आहे की,कांचा जंगल हे हैदराबाद शहराचे ‘फुफ्फुस’ समजले जाते. कांचा जंगल वर बुलडोजर चालवून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात असेल तर परिसराचे तापमान 1 ते 4 अंश सेल्सिअसने जास्त वाढण्याची शक्यता पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जंगलात सध्या परिस्थितीला या जंगलात ४५५ हून अधिक झाडांच्या प्रजाती वनस्पती व वन्यजीव प्रजाती आहेत. या जंगलात हरण, हत्ती, राष्ट्रीय पक्षी मोर यांच्यासह अनेक दुर्मिळ प्राणी, पक्षी,वास्तव्य करतात. त्या बरोबरच औषधी वनस्पती व जैवविविधतेचा समावेश हीं आहे. बुलडोझर फिरवल्यामुळे अनेक प्राणी बेघर झाले असून,बहुतांश मृत्यू झाल्याचे ही नमूद करण्यात आले आहे. जंगल तोडीवर न्यायालयाने आक्षेप नोंदवत वृक्षतोडीवर स्थगिती आदेश दिला आहे.

त्यामुळे भविष्यातील होणारी वृक्षतोड लक्षात घेता खबरदारी लवकर घेणे महत्त्वाचे वाटते निवेदनावर मध्येआहे.या बुलडोजर प्रकरणातील संबंधित अधिकारी,मंत्र्यांवर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी,अशीही मागणी निवेदक मिलिंद साळवे,अड.उत्तम काळे,अड.विलास लांडगे, प्रभू राठोड, सिद्धार्थ हत्तीअम्बिरे,अनंत उजगीरे स्वाक्षरीने कळविले आहे.