सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची स्टाफसह पुन्हा एकदा अवैध धंद्यांवर धडक कारवाई

185

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

🔺तब्बल 7 लाख 28 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त, आरोपीस अटक

 म्हसवड(दि.10एप्रिल):-पोलीस ठाणे हद्दीतील पानवण तालुका माण गावचे हद्दीत ओढ्याचे पात्रात एक लाल रंगाचा ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉलीमध्ये वाळू भरून चोरटी वाहतूक करीत असले बाबतची खात्रीशीर बातमी काढून सदर ट्रॅक्टर व ट्रॉलीला पकडण्याकरिता जात असताना पानवन गावाजवळ एक लाल रंगाचा ट्रॅक्टर, ट्रॉलीसह रोडवर दिसल्याने त्याचा पाठलाग करून पकडले असता त्यामध्ये वाळू भरलेली दिसून आली. त्यामुळे या अनुषंगाने म्हसवड पोलीस ठाण्यात आरोपी नामे 1) मनोहर जगन्नाथ जंगम आणि 2)सयाजी पंढरीनाथ कुंभार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून ट्रॅक्टर, ट्रॉली, वाळू असा 7 लाख 28 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणारे व वाळू वाहतूक करणारे यांचे धाबे दणाणले आहेत.

 सदरची कामगिरी ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, देवानंद खाडे, अमर नारनवर, सतीश जाधव, योगेश सूर्यवंशी, राहुल थोरात, नवनाथ शिरकुळे