आय सी यु ची सुविधा उपलब्ध करून देतो यात डॉक्टर मंडळींनी पुढाकार घ्यावा-आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांचे आवाहन

122

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.20एप्रिल):-गंगाखेड शहर व तालुक्यातील गंभीर आजाराच्या रुग्णांना रात्रीच्या काळात सुविधा अभावी अनेकांचे प्राण गेले आहेत रात्रीची उपचार सुविधा उपलब्ध होत नाही येथील येथील उपजिल्हा रुग्णालयात वीस खाटा चे आय सी यु सुविधा साहित्य उपलब्ध करून दिले आहे त्या शहरातील सर्व डॉक्टर मंडळींनी सहकार्य करावे असे आव्हान आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी केले.

सुमन फंक्शन हॉल येथे व्यापारी महासंघ गंगाखेड व लायन्स क्लब गंगाखेड टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर असोसिएशन व आडत असोसिएशनच्या नवनिर्वाचित नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर आमदार रत्नाकर गुट्टे तर व्यासपीठावर डॉक्टर असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर के पी गारुळे कोषाध्यक्ष डॉक्टर किशोर कुगणे आडतअसोसिएशनचे निर्वाचित अध्यक्ष गोविंद रामराव जाधव सचिव अरुण उर्फ गोलू आष्टुरकर उपाध्यक्ष गोविंद गोरे तुकाराम काकडे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडू सोमानी लायन्स क्लबचे अध्यक्ष गोविंद निरस उपस्थित होते

याप्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा व्यापारी महासंघ व लायन्स क्लब च्या वतीने आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रसंगी डॉक्टर केपी गारोळे यांनी डॉक्टर असोसिएशनच्या विविध प्रकारच्या आरोग्य सुविधा व शिबिरे आयोजित करण्याचा संकल्प केला डॉक्टर किशोर कुगणे आपले मनोगत व्यक्त केले.

पुढे बोलताना डॉक्टर आमदार गुटे म्हणाले की, गंगाखेड नगरपरिषदेची सत्ता माझ्या हातात नसताना कोट्यावधी रुपयाचा निधी नगरपरिषदेस आणून दिला त्यात भविष्यातील पन्नास वर्षे पाणीपुरवठा योजना, न‌ प ची सुसज्ज अशी दोन मजली इमारत, उपजिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तसेच त्यांचे निवासस्थान, तहसील कार्यालय कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, पंचायत समिती कार्यालय व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, सुसज्ज असे नाट्यगृह सभागृह, नमामि गंगा योजनेअंतर्गत गोदावरी काठाच्या दोन्ही बाजूचे शुशोभीकरणास कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला आहे संत जनाबाई मंदिर परिसरात वारकरी निवास, अध्यायवंत गार्डन ,सभागृह आदीसाठी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे नवीन बस स्थानकाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृहाची वास्तु लवकरच पूर्ण होत आहे, शहरातील विविध रस्त्यासाठी कोट्यावधी रुपये आणून बरेचसे कामे पूर्ण केली छोटी मोठी राहिलेली कामे नगरपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी पूर्ण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडू सोमानी, ज्ञानेश्वर राजूरकर, सचिन दहिवाळ, माऊली शिंदे बालासाहेब पारवे, जगन्नाथ आंधळे बालाजी महाजन विलास मंगरूळकर मार्केट कमिटीचे संचालक प्रमोद आप्पा धुळे विजय कुमार शर्मा तर लायन्स क्लब गंगाखेड टाऊन च्या वतीने कॅबिनेट ऑफिसर केशव देशमुख संभाजी वाडेवाले प्राध्यापक डॉक्टर राजीव आहेरकर संजय तापडिया महादेव गीते प्राचार्य बालाजी ढाकणे गोविंदराव निरस रामेश्वर तापडिया डॉक्टर एम बी मानकर डॉक्टर धुमाळ, दर्लिंग भूसनर, संजय धुळे ,नाथराव चाटे प्रताप सिंग ठाकूर ,विजय आप्पा सावरगावकर, संजय दुधाटे ,पाठक ,काळे आदीने परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे संचलन कॅबिनेट ऑफिसर केशव देशमुख प्रास्ताविक डॉक्टर एम बी मानकर तर आभार प्रदर्शन संभाजी वाडेवाले यांनी केले.