

▪️साईनगरच्या संत शिरोमणी रविदास महाराज बचत गटाचे आयोजन
✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.26एप्रिल):-संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांचं जगमान्य व्यक्तिमत्त्व सर्वदूर प्रसारित व्हावे या उद्देशाने साईनगरच्या संत शिरोमणी रविदास महाराज बचत गटाचे (र. नं. महा. ८८७/०१४ अम.)अध्यक्ष व सर्व सदस्यांनी रात्रंदिवस परिश्रम करून साईनगर येथे गुरू रविदास भवनाची भव्य इमारत उभारली असून या भावनाचा लोकार्पण सोहळा रविवार दि.२७ एप्रिल २०२५ रोजी संध्या.६.०० वाजता संपन्न होत आहे .
या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटक आमदार श्री.रविभाऊ राणा,मा.खासदार सौ. नवनीतताई राणा असून सोहळ्याचे अध्यक्ष मा.पांडुरंगजी उ. खंडारे (अध्यक्ष,संत शिरोमणी रविदास महाराज बचत गट, साईनगर,अमरावती.) तर प्रमुख अतिथी मा.प्रा.श्रीप्रभू चापके (मुख्य मूल्यांकन अधिकारी स. गा.बा.अम.विद्यापीठ) मा.प्रकाश रा.शेलापूरकर (अध्यक्ष,सर्योदय शिक्षण संस्था,अकोला) हे राहणार आहेत.लोकार्पण सोहळ्याचा प्रारंभ अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले हे त्यांच्या ” निखारा ” या काव्यसंग्रहातील स्वरचित “गुरू रविदास” हे वंदन गीत गाऊन करणार आहेत.
हे भवन समाजाला लोकार्पित करून आजच्या आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांना ते प्रेरणादायी ठरणार आहे.
या लोकार्पण सोहळ्यासाठी समाजबांधवांची उपस्थिती प्रार्थनीय आहे,असे एका पत्रकाद्वारे संत शिरोमणी गुरू रविदास महाराज बचत गट साईनगर,अमरावतीचे अध्यक्ष मा.पांडुरंग खंडारे यांनी कळविले आहे.



