‘यशोधरा’ ऐतिहासिक उपेक्षित पात्र-प्रा. डॉ.एम.डी.इंगोले

74

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.27एप्रिल):-येथील श्री संत जनाबाई महाविद्यालयात हिंदी अनुवादित नाटकाचे प्रकाशन व चर्चासत्र संपन्न झाले. या प्रसंगी प्रा.डॉ.एम.डी.इंगोले असे म्हणाले की, ऐतिहासिक दृष्टिने यशोधरा हे पात्र उपेक्षित आहे. ते आता खर्या अर्थाने हिंदी अनुवादाच्या रूपाने जगा समोर आले आहे. अनुवादाची प्रक्रिया किती जटिल आहे या विषयी इंगोले यांनी मनोजगत सांगितले. ही नाट्य रचना न्यू वर्ल्ड पब्लिकेशन नई दिल्ली द्वारा प्रकाशित झाली आहे. व ती वाचकांसाठी अमेझॉन वर ही खरेदी साठी उपलब्ध आहे.

    या कार्यक्रमसाठी यशोधरा नाटकाचे लेखक नारायणराव जाधव उपस्थित होते. त्यांनी या प्रसंगी सांगितले की, या रचनेचे विविध भारतीय भाषांमधे अनुवाद झाले पाहिजे.असे झाले तर यशोधरेचे खरे चरित्र विश्व साहित्य पटलावर समोर येईल.

     उद्घाटक म्हणून प्रा.डॉ.सुरेश शेळके उपस्थित होते. ते म्हणाले की, सिध्दार्थ बुद्ध झाले व यशोधरा आपल्या त्यागवृति व शौर्याने इतिहास घडविला. यशोधरा भारतीय संस्कृतीची अग्रदूत आहे.

     चर्चा सत्रामध्ये प्रा.डॉ.चंद्रकांत एकलारे यांनी यशोधरा नाटक संहितेवर सांगोपांग चर्चा केली. व ते म्हणाले की, नाटकाच्या तत्वानुसार कथानक, चरित्र चित्रण, देश-काल वातावरण, संवाद, उद्देश्य आणि भाषा शैलीच्या दृष्टिने यशोधरा हे नाटक उत्कृष्ट आहे. आणि त्यासाठी इंगोले सर हे अभिनंदनास योग्य आहेत. तसेच ही रचना सुखांत आणि दुखांत नसून परिवर्तनशील आहे. यशोधरा नाटकावर संशोधन होने गरजेचे आहे. प्रा.डॉ.सविता कीर्ते यांनी यशोधरा नाटकातील पात्र सिध्दार्थ, रोहिणी, देवदत्त, महाराज दंडपाणी, महारानी प्रमिता, महाराज सिध्दोधन, महारानी प्रजाति व सेनापती आणि पुरोहित यांच्या चरित्र चित्रणावर प्रकाश टाकला. नाटकातील सुंदर संवाद योजना व अप्रतिम कविता लेखनाने समापन वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आहे.

चर्चा सत्राचे समापन प्रा.डॉ.संजय जाधव यांनी साधक-बाधक चर्चेने केले.

     कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.बी.एम.धूत सर म्हणाले की डॉ.इंगोले हे आमच्या महाविद्यालयाचा गौरव आहेत. ते निरंतर शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, अकादमिक कार्यामधे हिरीरीने सहभाग घेतात. त्यांनी राष्ट्रीयस्तरावर आमच्या महाविद्यालयाचे नांव रौशन केल आहे.

      विशेष उपस्थिती- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विद्यापीठ नांदेड़ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.डॉ.संतराम मुंढे व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत सातपुते सर, दिग्दर्शक सुनील ढवळे, अभिनेते प्रा. डॉ. अंकुश वाघमारे, डॉ.भास्कर गायकवाड़, गजलकार यशवंत मस्के, रावसाहेब मस्के, सामाजिक कार्यकर्ते विलासराव जंगले उपस्थित होते.

     प्रा.डॉ.कीर्तिकुमार मोरे सर यांनी सुंदर प्रास्ताविक हिंदीतून केले. आपल्या बहारदार शैलीतून प्रा. डॉ. गौतम वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाची समापन पहलगाम शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीता ने झाले.

      या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. सुर्वे भारत हतीअंबीरे, श्रीनिवास खलिकर, जवादे मामा व सर्व सहकारी यांनी परिश्रम घेतले.