चाय व सिगारेट उधार न दिल्या मुळे तरुणाचा खून

1163

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

 गंगाखेड(दि.29एप्रिल):- गंगाखेड येथील आज दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी सकाळी अंदाजे 8.30 वाजण्या सुमारास गोदावरी घाटावर मारोती तुकाराम साळवे रा. आंबेडकर नगर यांचा खून करण्यात आला.अशी फिर्याद आविंद मारोती साळवे रा. आंबेडकर नगर गंगाखेड यांनी पोलीस ठाणे गंगाखेड येथे केली आहे.या फिर्यादी मध्ये मारोती तुकाराम साळवे यांची बस स्टॉप तथा रजा मजीद जवळ “बाबा सैलानी “या नावाची हॉटेल व पान टपरी चालवायचे दर रोज सकाळी पाच ते रात्री दहा प्रयन्त चालू असायची.

माझ्या वडिलांच्या हॉटेलवर गंगाखेड मधील आरोपी असलेले हे नेहमी माझ्या वडिलांचे हॉटेलवर येऊन चाय सिगारेट घ्यायचे व पैसे देत नव्हते,माझ्या वडिलाने पैसे मागितले कि ते भांडणे करायचे .आज दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8.00 वाजत मी व माझे वडील मारोती तुकाराम साळवे व मी आम्ही दोघे हॉटेलवर असता,या वेळी किशोर मंचक भालेराव यांच्या सांगण्यावरून ,अवेज खान गफार् खान पठाण व जुनेद खान जरावर खान हे पांढऱ्या रंगाच्या कार मध्ये कार क्रमांक Mh09/DA 2850 या कार मधुन् हॉटेल वर आले,व माझ्या वडिलांकडे चाय व सिगारेट मागितली असता,ते नेहमीच चाय व सिगारेट चे पैसे देत नसल्या मुळे ,माझ्या वडिलाने चाय व सिगारेट दिली नाही.

त्या मुळे त्यांनी माझ्या वडिलास बाबा सैलानी तु बोहत माजे गया तुने हमको चाय सिगारेट दिया नही तुझे दिखाते हम रुख् जरा,असे म्हणून ते दिलकस चौकाकडे निघून गेले ते नेहमीच माझ्या वडिलाला असा त्रास देत असल्यामुळे मी व माझे वडील आम्ही दोघेही त्यांच्या पाठीमागे पळत पाठलाग करत गेलो असता ते गोदावरी घाटावर चाय पीत थांबले होते आम्ही अंदाजे साडेआठ वाजता त्यांच्याजवळ गेलो व त्यांना तुम्ही आम्हाला का त्रास देत असता असे विचारणा केली असता ,त्यांनी आम्हाला शिवीगाळ करून त्यांनी माझे वडीलाला तुझे जिंदा नही छोडेंगे असे म्हणून त्यांनी अवेज खान गफार खान पठाण यानी माझ्या वडिलाच्या पोटात लाथ घातली त्याच वेळी माझे वडील डोकयावर खाली पडले,त्याच वेळी दोघांनी माझ्या वडिलांच्या छातीत,पोटात,अवघड ठिकाणी लाथा,बुक्या घातल्या मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होतो परंतु जुनेद खान यानी माला मारहाण केली माझ्या डाव्य पायला झखम झाली असून या मारहाणीत माझे वडील बेशुद्ध पडले असता.

तेथील जमलेल्या गोदा घाट वरील लोकांनि सोडवा सोडवी केल्या नंतर,अवेज खान ,व जुनेद खान तेथून पळून गेले.त्या ठिकाणी माझा भाऊ बाबा मारोती साळवे ऑटो घेऊन आला ऑटो मध्ये सरकारी दवाखाना गंगाखेड येथे आणले असता येथील डॉकटरांनी तपासून मयत झाल्याचे सांगितले.त्या नंतर मी पोलीस ठाणे गंगाखेड येऊन तक्रार दिली आहे.

गोदाघाट गंगाखेड येथे किशोर मंचक भालेराव याच्या सांगण्यावरून आरोपी (1)अवेज खान गफार खान पठाण, रा. नेहरू चौक गंगाखेड. (2)जुनेद जरवार खान रा. वजीर कॉलनी गंगाखेड. यांनी संगत मत करून माझ्या वडिलाने चाय व सिगारेट न दिल्यामुळे माझ्या वाडीलाचा मृत्यू घडवून अनन्याच्या उद्देशाने माझ्या वडिलांच्या पोटात लाथ घालून त्यांना डोक्यावर खाली पाडून त्यांच्या छाती मध्ये, पोट वर आणि अवघड जागी लाथा बुक्या घालून जीवे ठार मारून त्यांचा खून केला आहे म्हणून माझी, 1)अवेज खान गफार खान पठाण. रा. नेहरू चौक गंगाखेड. 2)जुनेद जरवार खान रा. वजीर कॉलनी गंगाखेड. 3)किशोर मंचक भालेराव रा. नवा मोंढा गंगाखेड. यांच्या विरोदात भारतीय न्याय सहिंता 2023 नुसार 103(1),115(2),352, 351(1), 3(5), अनुसचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंद )1989नुसार. 3(2)(VA), 3(1)(r),3(1)(s) नुसार पोलीस ठाणे गंगाखेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा होण्या आधीच गंगाखेड पोलीस आणि स्थानिक गुन्हे सायबरच्या पाथकाने गुन्हातील तिन्ही गिन्हेगारांना ताब्यात घेतले.

तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे करीत असून, या घटनेची माहिती मिळताच परिविक्षधीन साय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे, स. पो. नि. आदित्य लोणीकर, पो. उप. नि. विशाल बुधोडकर, सिद्धार्थ इंगळे, शंकर रेंगे, समीर पठाण, पोले, राहुल खडे. आदिनी घटना स्थानि धाव घेतली