वीरशैव समाज बांधवांच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी

94

✒️प्रतिनिधी गंगाखेड(अनिल साळवे)

गंगाखेड(दि.30एप्रिल):-महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या 891 व्या जयंतीनिमित्त वीरशैव समाज बांधवांच्या वतीने (दिनांक 30 एप्रिल बुधवार) रोजी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.जयंती कार्यक्रमाचे आयोजन गंगाखेड शहरातील वीरशैव समाज बांधवांच्या वतीने पलसिद्ध स्वामी मठ संस्थान येथे करण्यात आले होते.

महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकात विविध जाती धर्माना एकत्रित करून समता प्रस्थापित केली,समतानायक, लोकशाहीचे बीज रोवले,अनुभव मंडप पद्धत सुरू करून लोककल्याणासाठी अहोरात्र कार्य केले व प्रस्थापिताविरुद्ध बंड करून मानव धर्म एकच आहे,असा समतेचा-सामाजिक संदेश दिला म्हणून संपूर्ण जगभर महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.

शहरातील पलसिद्ध मठ संस्थान येथे आयोजित जयंती कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार पुष्पांजली अर्पण करून महाआरती करण्यात आली यावेळी समाजातील ज्येष्ठांनी आपले मनोगत व्यक्त केले या जयंती कार्यक्रमास वीरशैव समाजाचे अध्यक्ष पांडुरंगआप्पा शेटे, उपाध्यक्ष चंद्रशेखर आष्टेकर, सचिव राजेश्वर गौरकर,बालाजीआप्पा शेटे,गजानन आग्रे,शंकर मंदोडे,दीपक शेटे,सोमेश्वर दामा,विजयकुमार सावरगावकर,पिंटू टेकाळे,सुभाष स्वामी,दावलबाजे अप्पा,काडवदे अप्पा,रमेश शेटे, कंडक्टर मंदोडे,चापुले आप्पा आदी समाज बांधव उपस्थित होते