श्रेणी २ ची विस्तार अधिकारी पदोन्नती केंद्र प्रमुख मधून व्हावी-पुरोगामी शिक्षक संघटनेची शासनाकडे मागणी

68

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

   चंद्रपूर(दि.3एप्रिल):-सन १९६७ पासून रिक्त असलेली शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी २- वर्ग ३ ची पदोन्नतीची पदे कार्यरत केंद्र प्रमुख भरणेत यावीत अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने राज्याचे ग्रामविकास सचिव एकनाथ डवले यांच्याकडे निवेदनाद्वारे नुकतीच केली. यावेळी विस्तार अधिकारी पदोन्नती बाबत सेवा प्रवेश नियमावलीमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू असून आपल्या मागणी बद्दल सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन एकनाथ डवले यांनी संघटनेस दिले.

      महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवा प्रवेश) नियम १९६७ व महाराष्ट्र शासन अधिसूचना दि.१० जून २०१४ अन्वये शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी ३- वर्ग ३ या पदांवार ५ वर्षे सेवा झालेल्या विस्तार अधिका-यांना श्रेणी २- वर्ग ३ पदांवर पदोन्नती देण्याची तरतूद आहे.

       विस्तार अधिकारी श्रेणी ३- वर्ग ३ या पदावर पदोन्नती ही सेवानिवृत्तस ६ महिने ते १ वर्ष शिल्लक असताना होते. त्यामुळे या पदावर ५ वर्षे सेवा कोणाचीही होत नाही. करीता विस्तार अधिकारी श्रेणी २- वर्ग ३ या पदांवर कधीच पदोन्नती होत नाही. सदर पदे कायमच रिक्त राहीलीली आहेत.

      उदा.कोल्हापूर जिल्हा परिषदकडे शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी २- वर्ग ३ ची १२ पदे मंजूर असून आतापर्यंत एकाही पदावर पदोन्नती झालेली नाही. ही १२ पदे कायमस्वरूपी रिक्तच आहेत. ही परिस्थिती राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये आहे.

        तेव्हा पर्यवेक्षक यंत्रणा सक्षम होण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवा प्रवेश) नियम १९६७ व महाराष्ट्र शासन अधिसूचना दि.१० जून २०१४ यामध्ये सुधारणा करून *शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी २ वर्ग ३ चीपदे ६ महिन्यापेक्षा अधिक कालावधी केंद्र प्रमुख पदावर कार्यरत असणाऱ्या केंद्र प्रमुखांमधून मूळ सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीने भरण्यात यावीत अशी मागणी शासनाकडे केली आहे.

     निवेदनावर संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरिश ससनकर, केंद्र प्रमुख एन. डी. साळवी, सुभाष केरीपाळे आदिंच्या सह्या आहेत.असे पुरोगामी चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार, जिल्हा सरचिटणीस सुरेश गिलोरकर यांनी कळविले आहे.