आमदारांनो,चोरी करू नका…रस्ता पक्का बनू शकतो!

154

▪️बकरी खाणारे लांडगे, कोल्हे तुमच्या सोबत बसले आहेत आणि तुम्ही गिधाडांना विचारले, “सांग बकरी कोणी खाल्ली?”

       जळगाव जिल्ह्यातील आमदार आणि मंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता श्री पाटील यांना रस्ता बाबत चांगलेच झापले. आधी कैमेरा चालू केला. मग डायलॉग सुरू केले.

  ” लोक मला रस्ता बाबत प्रश्न करतात. माझ्याकडे उत्तर नाही. मला लाज वाटते.”

   आमदारांना रस्ता बाबत लाज वाटण्याची गरज नाही. कमीशन घेतांना लाज वाटली पाहिजे. आणि कोणाला झापले? एका नोकराला. ते ही पालकमंत्री समोर. व्वा! काय ड्रामा आहे! बकरी खाणारे लांडगे, कोल्हे तुमच्या सोबत बसले आहेत आणि तुम्ही गिधाडांना विचारले, “सांग बकरी कोणी खाल्ली?”

    तो काय बिचारा! आमदार, खासदार, मंत्री ला वाटून झालेल्या निधी मधून उरले सुरले, सांडलेले वेचून खाणारा.

    आमदारांनो, खासदरांनो, मंत्र्यांनो, तुम्ही खरोखर प्रामाणिक असाल तर आजपासून रस्ता, गटार, पाणीची टाकी अणि अन्य सरकारी कामाची वर्क ऑर्डर ऑनलाईन करा. आधी वर्क ऑर्डर जाहिर करा मग भूमिपजन करा. त्यात लिहा,

१)हा रस्ता आधी कधी बनवला होता?

२)यांचा ठेकेदार कोण होता?

३)आता ठेकेदार कोण?

४) रस्ता कोठून कोठपर्यंत?

५)याची लांबी, रूंदी,खोली किती?

६) प्रस्ताव कोणी टाकला होता?

निधी कशातून दिला आहे?

७)काम करवून घेणारी एक्जीक्युटीव्ह बॉडी कोणती?

८) सरकार कडून इंजिनिअर कोण? नांव, फोन नंबर सहित.

९) ठेकेदार कडून इंजिनिअर कोण? नांव, फोन नंबर सहित.

१०) ठेकेदाराला किती अँडव्हान्स दिला?

११) कामाची मुदत किती, कधीपर्यंत?

१२)रस्त्याचे अपेक्षित आयुष्य किती ?

१३) ठेकेदाराची दुरूस्तीची जबाबदारी कधी पर्यंत?

१४) अर्थमंत्रीला किती टक्के दिले?जर दिले असतील तर.

१५) आमदारांनी किती टक्के घेतले?जर घेतले असतील तर.

१६) पालकमंत्री ने किती टक्के घेतले? जर घेतले असतील तर.

१८) कलेक्टर आणि इंजिनिअर यांना किती टक्के दिले जातील? त्यांना देत असाल तर! आणखी कोणी लाभार्थी असेल तर नावासहित वाटा हिस्सा रक्कम लिहा.

१९)याचे मेझरमेंट कोण इंजिनिअर केंव्हा करील?

२०)याचे बील पेमेंट ठेकेदाराला कधी देणार आहात?

२१) शहरातील किती रस्ते किती निधी देऊन सुरू केले आहेत?

२२) आतापर्यंत किती रस्ते बनवले?किती खर्च आला? पेमेंट किती दिले?

२३) बाकीचे बील पेमेंट का दिले नाही? कधी देणार आहात?

   ही सर्व माहिती ऑनलाइन टाकली पाहिजे. जर आमदार, खासदार, मंत्री भुमिपुजन करीत असेल तर सोम्या गोम्या चोरांची नांवे टाकण्याऐवजी तेथे बैनर व उपरोक्त २३ मुद्दे टाकले पाहिजे.

    भोळे, महाजन, गुलाबराव जर तुम्ही लोक जनतेशी खरोखरच इमानदार असाल तर एकदा इतकी इमानदारी दाखवा. जेणेकरून आम्ही जनता रस्ता मोजून खात्री करू कि हा रस्ता इतक्या निधीचा आहे.

     आता जळगाव जिल्ह्यातील ज्या आमदारांनी रस्ता गटार किंवा अन्य योजनेचे भुमिपुजन करतांना कुदळ मारून डोचर पाडला असेल तर तेथेही असेच बैनर लावा.

   मला वाटते, तुम्हाला मिळणारे मानधन इतके जास्त आहे कि तुम्हाला कोणतीही चोरी, लाचखोरी, कमीशन खोरी टक्केवारी, हरामखोरी करण्याची गरज नाही. तरीही जर तुमची भूकमारी, उधारी, कर्जबाजारी होत असेल तर आम्ही नागरिक तुम्हाला तुम्ही मतांचे दिलेले पैसे परत करू. तुम्हाला आत्महत्या करू देणार नाही. ही जबाबदारी मी व्यक्तीश: आणि आम्ही नागरिक घेतो. तुम्हाला भुकेले मरू देणार नाही. पण चोरी करू देणार नाही.

   जर माझ्या मागणीवर कोणा प्रामाणिक आमदार खासदार मंत्री ला आक्षेप असेल तर तयार राहा. मी तुमची जाहीर मुलाखत घेतो. जर मंडप टाकून, हात जोडून मते मागतात तर मंडप टाकून आम जनतेला इमानदारीने सामोरा गेलेच पाहिजे.

    बघा, हिंमत असेल तर! इमानदार असाल तर!

✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२