उन्हाळी धान पीक संकटात

141

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा(दि.7मे):-जिल्हयात मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांना काही प्रमाणात उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तापमानात घट झाली असली तरी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विजा व मेघगर्जनेसह पाऊस झाला.जिल्हयात उन्हाळी धानाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे वादळी वारा,अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे.

धान फुलोऱ्यावर आलेला आहे.हलक्या प्रतीचे धान पीक तीन चार दिवसात कापणीला येणार आहे.याच दरम्यान जिल्हयात अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे.अनेक शेतकऱ्यांनी पाणी टंचाई असतांनाही विविध साधनांनी पाणी पुरवठा केला.औषधांच्या फवारण्या केल्या.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे धान पीक भुईसपाट होण्यास सुरुवात झाली आहे.शेतकऱ्याच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे.आंबा फळ प्रभावित झाले.शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. अवकाळीमुळे शेतीवर केलेला खर्च निघणार की नाही या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.

नुकसानग्रस्त शेकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तापमानात अचानक घट झाली आहे याचा विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होण्याची शक्यता आहे. व्हायरल आजार बळावू शकतात.नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.