दहावीच्या परीक्षेत मानसी खोब्रागडेला घवघवीत यश

177

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.18मे):-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे द्वारा जाहीर करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत ज्ञानमाता हायस्कूल अमरावतीची विद्यार्थिनी कु.मानसी माणिक खोब्रागडे हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत (इंग्रजी माध्यम) घवघवीत यश संपादन केले आहे.मानसीने 91 प्रतिशत गुण प्राप्त केले असून इंग्रजी विषयात 90, मराठी 94, हिंदी 90, गणित 88, विज्ञान व तंत्रज्ञान 89 आणि सामाजिक शास्त्र 92 असे एकूण 455 गुण प्राप्त केले आहे.

मानसीची आई रजनी खोब्रागडे भूमी अभिलेख कार्यालयात तर वडील एल आय सी कार्यालयात कार्यरत असून मानसीने नर्सरी ते इयत्ता दहावी पर्यंत अध्ययनाचे धडे इंग्रजी माध्यमातून ज्ञानमाता हायस्कूल अमरावती इथूनच घेतले आहे.भविष्यात तिला आय.टी.इजिनीअरींग बनायचे आहे.

मानसीने आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक,गुरुजन वर्ग तसेच आई रजनी -वडील माणिक यांना दिले आहे.तिचे सुयशाबद्दल एडवोकेट राजेश वैद्य,प्रा.डॉ.नरेश इंगळे यांच्यासह सर्व स्तरातील आप्तस्वकीय, मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.