मुख्यमंत्री फडणवीस यांनी चंद्रपूर जिल्ह्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर केले नाही ना?

267

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चिमूर(दि.13जून):- चंद्रपूर जिल्ह्यात सध्या एकही मंत्री नाही. पालकमंत्री जिल्ह्याबाहेरचे आहेत. चंद्रपूर जिल्हा हा तसा मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांचा गृह जिल्हा आहे कारण ते मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील मूलचे रहिवाशी त्यानंतर ते नागपूरला गेले. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या सुधीर मुनगंटीवार मूल, किशोर जोरगेवार चंद्रपूर, बंटी भांगडीया चिमूर, करण देवतळे वरोरा, देवराव भोंगळे राजुरा असे पाच आमदार भाजपाचे आहेत तर फक्त विजय वडेट्टीवार ब्रम्हपुरी हे एकमेव आमदार काँग्रेसचे आहेत.

        भाजपाचे पाच आमदार निवडून आले असताना चंदपूर जिल्ह्याला एकही मंञीपद मिळू नये हे फार मोठे दुर्देव आहे. अंतर्गत गटबाजी आता वाढीला लागली. यापूर्वीही होती पण उघड नव्हती, कदाचित यामुळे तर जिल्ह्याला मंञीपद मिळाले नसेल? या जिल्ह्यातील जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे सातवेळा विधानसभेत निवडून गेले. एक विक्रम त्यांनी नोंदविला. एवढी मोठी संधी या जिल्ह्याने अजुनपर्यंत कुणालाही दिली नसेल त्यांनी आपल्या पदाचा पूर्ण उपयोग करून अनेक कामे केली. एवढा जबरदस्त मंत्री असताना ऐन राञीतून त्यांचे नाव कसे कापले गेले हेही एक आश्चर्य आहे.

   कदाचित पुढे मुनगंटीवार वरचढ व डोईजड होवू नये म्हणून तर ही राजकीय खेळी नाही ना! चंद्रपूर जिल्हा हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला! परंतू अंतर्गत गटबाजीमुळे या जिल्ह्यात काँग्रेसचे अतोनात नुकसान झाले. आता त्याच मार्गाने भाजपाही जात आहे अंतर्गत गटबाजीच्या राजकारणामुळे पक्षाचे नुकसान तर होतेच परंतू जिल्ह्याचा विकास होत नाही.

या जिल्ह्याकडे कदाचित मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनीच तर दुर्लक्ष केले नाही ना? अशी जनमाणसात चर्चा आहे. असे जर असेल तर आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, सहकार क्षेञातील निवडणुका यांना वाली कोण? असाही प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे. या जिल्ह्याला अनेक विकासकामांची प्रतिक्षा आहे.