

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)
गंगाखेड(दि.16जून):- तालुक्यातील भेंडेवाडी येथील दिनांक 16 जून सोमवार रोजी शाळा सुरू झाली आज रोजी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.गंगाखेड तालुक्यातील भेंडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक दत्तात्रय परबत, शिक्षिका महानंदा घरजाळे, संगीता पुरी, प्रतिभा गीते सर्व शिक्षक वृंदांच्यावतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
गट साधन केंद्र गंगाखेड येथील विषयतज्ज्ञ शिक्षक दिलीप गिरी यांनी दुपारी शाळेला भेट दिली.शालेय परिसर व रंगरंगोटी आणि शाळेतील शैक्षणिक साहित्य पाहून गिरी यांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेशराव होळंबे व विषयतज्ज्ञ दिलीप गिरी शाळेतील सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.शाळेचे नविन कंपाऊंड पाहून गिरी यांनी शाळेच्या बाबतीत समाधान व्यक्त केले.आणि नविन शैक्षणिक वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या



